आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामधुबनी जिल्ह्यातील मधवापूर ब्लॉकमधील सहरघाट येथील कुशेश्वर साहनी यांचा मुलगा राजू साहनी हा ड्रीम 11 मध्ये एक कोटी रुपये जिंकून रातोरात करोडपती झाला आहे. ड्रीम 11 मध्ये 1 कोटीची रक्कम जिंकणारा जिल्ह्यातील तो तिसरा व्यक्ती ठरला आहे. विजयानंतर त्याच्या भावांनी कोट्यधीश झाल्याने त्याला मिठाई खाऊ घालून आनंद व्यक्त केला. यासोबतच त्याच्या घरी आता अभिनंदन करणार्यांची गर्दी होत आहे.
बऱ्याच दिवसांपासून आजमावत होता नशीब
मधुबनीतील सहारघाट, मधवापूर ब्लॉकमध्ये राहणारा राजू साहनी अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर ड्रीम 11 मध्ये 1 कोटी जिंकण्यात यशस्वी झाला. शनिवार 8 मार्च 2023 रोजी चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामन्यात मुंबईच्या विजयावर राजू साहनी याने 1 कोटीचे बक्षीस जिंकले. राजू साहनी याचा बंगळुरूमधील सहकारी आणि उत्तर प्रदेशमधील रूममेट राजा महतो याने सांगितले की, राजू नेहमी ड्रीम 11 मध्ये गेमवर पैसे लावायचा. यावेळीही त्याने सामन्यात टीम लावली होती. जिंकल्याबरोबर सर्वात आधी त्याने मला माहिती दिली. त्यानंतर त्याने कुटुंबीयांनाही याबाबत माहिती दिली.
खात्यात आले 70 लाख रुपये
राजू साहनी याने सांगितले की, ड्रीम 11 मध्ये मॅच सेट करणे हादेखील डोक्याचा खेळ आहे. एक चांगला संघ निवडल्याचा परिणाम आज समोर आल्याचे त्याने सांगितले. त्याने सांगितले की, 1 कोटी जिंकल्यानंतर टॅक्स वजा जाता उर्वरित 70 लाख रुपये त्याच्या खात्यात आले आहेत.
आई-वडील पंजाबमध्ये मजूर
कोट्यधीश राजू साहनी याचे शालेय शिक्षण मधुबनीमध्येच झाले. पदवीनंतर राजू बंगळुरूमधील कोटक महिंद्रामध्ये आयटी अभियंता (नेटवर्किंग) म्हणून काम करत आहे, तर त्याचे आई-वडील पंजाबमध्ये मजूर म्हणून काम करतात.
चहुकडून अभिनंदनाचा वर्षाव
मधुबनी येथे दोन भाऊ त्यांच्या पत्नी आणि मुलांसह राहतात. ड्रीम 11 मध्ये राजू साहनी याने 1 कोटी जिंकल्यानंतर मधुबनीतील त्याच्या भावांनी एकमेकांना मिठाई खाऊन अभिनंदन केले. राजूने 1 कोटी जिंकल्याची चर्चा गावात आगीसारखी पसरली आणि रविवारी सकाळपासूनच त्याच्या गावातील घरी अभिनंदन करणाऱ्यांची गर्दी सुरू झाली.
जिल्ह्यातील 3 लोकांनी जिंकली 1-1 कोटींची रक्कम
याआधीही मधुबनी जिल्ह्यातील अशोक ठाकूरने 25 सप्टेंबर 2022 रोजी आयपीएल सामन्यात 1 कोटी रुपये जिंकले होते आणि सहारघाट येथील आणखी एक तरुण सानू कुमारने ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये ड्रीम इलेव्हन संघ तयार करून 1 कोटी जिंकले होते. यासोबतच गेल्या 7 महिन्यांत जिल्ह्यातील 3 जणांनी 1 कोटींची रक्कम जिंकली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.