आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चीनी सैनिकांशी झालेल्या हिंसक झडपेत शहीद सुनील कुमार यांच्यावर गुरुवारी लष्करी इमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा 10 वर्षीय मुलगा आयुषने मुखाग्नी दिला. तत्पूर्वी, बिहाटाच्या तारानगर ते मनेर येथील गंगा घाटपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. यादरम्यान लोकांनी भारत माता की जय आणि वीर सुनील अमर रहे घोषणा दिल्या. सुनील यांचे पार्थिव सकाळी मूळ गावी आणण्यात आले होते. या अंत्ययात्रेत बिहारच्या रेजिमेंटचे जवान आणि अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सेनाच्या जवानांच्या उपस्थितीत गंगाच्या हल्दी छिपरा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिव गंगा घाटावर आणल्यानंतर पावसाला सुरुवात झाली होती. परंतु यानंतही लोक तेथून हटले नाही. 15 जून रोजी रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झडप झाली होती. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते.
सरकारने माझ्या पतीच्या बलिदानाचा बदला घ्यावा - शहीद जवानाची पत्नी
सुनील यांची पत्नी रीति कुमारी म्हणाल्या की, सरकारने माझ्या पतीच्या हुतात्म्याचा चीनकडून बदला घ्यावा. लोकांनी चीनच्या सामानावर बहिष्कार टाकावा. चीन सीमेवर आपल्या सैनिकांचे प्राण घेत आहे आणि पैसे कमवण्यासाठी आपल्याकडे सामानाची विक्री करतोय. भारतात चीनच्या कोणत्याही सामानाची विक्री झाली नाही पाहिजे.
मनेरमधील गंगा घाटाकडे निघालेल्या सुमारे 15 कि.मी.च्या अंत्ययात्रेत पार्थिवासोबत हजारो लोक चाल होते. रस्त्यात लोकांना पार्थिवावर पुष्ववृष्टी केली. या दरम्यान लोकांनी शहीद सुनील भैय्या अमरे रहें आणि हिंदुस्थान जिंदाबादची घोषणाबाजी केली. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची घोषणाही लोकांनी केली.
सुनील यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले आहेत
सुनील यांच्या वडिलांचे नाव बासुदेव साव आणि आईचे नाव रुक्मिणी देवी आहे. ते 2002 मध्ये सैन्यात भरती झाले होते. 2004 मध्ये अरवल जिल्ह्यातील सकडी गावातील रीति कुमारी हिच्याशी त्यांचा विवाह झाला होता. सुनील यांना 10 वर्षीय आयुष, 5 वर्षांचा विराट आणि 12 वर्षांची सोनाली एक मुलगी आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.