आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कारचालक गाडीच्या बोनेटला लटकलेल्या व्यक्तीला घेऊन सुमारे 3 KM गाडी चालवत होता. तर बोनेटवर लटकलेला माणूस जीव वाचवा म्हणून विनवणी करत होता. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री दिल्लीच्या आश्रम चौक ते निजामुद्दीन दर्गा या दरम्यान घडली.
या घटनेचा येथे पाहा व्हिडिओ.....
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास आश्रम चौक ते निजामुद्दीन दर्ग्याच्या दिशेने येणारी एक कार बोनेटला लटकलेल्या व्यक्तीसह सुमारे 2-3 किलोमीटर पुढे जात होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपीच्या कारचा पाठलाग करून बोनेटवर लटकलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बिहारच्या खासदाराची होती कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार बिहारचे लोकसभा खासदार चंदन सिंह यांची असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी खासदार गाडीत नव्हते. त्यांचा चालकच एकटा कारमध्ये होता. पोलिसांनी अनियंत्रीत गाडी चालवल्याचा गुन्हा चालकावर दाखल केला आहे.
पीडित व्यक्ती आहे कॅब चालक
चेतन असे पीडित व्य़क्तीचे नाव आहे. तो कॅब चालक आहे. चेतनने सांगितले की, 'मी ड्रायव्हर म्हणून काम करतो, एका प्रवाशाला सोडून परतत होतो. आश्रमाजवळ पोहोचल्यावर एका कारने माझ्या कारला तीन वेळा जोरदार धडक दिली. मग मी माझ्या गाडीतून बाहेर आलो. त्याच्या गाडीसमोर उभा राहिलो. त्यानंतर त्याने (आरोपी) गाडी सुरू केली आणि माझ्या अंगावरच घातली. मी कसाबसा जीव वाचवत बोनेटला लटकलो. त्याला मी थांबविण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्याने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. मध्ये पोलिसांची गाडी दिसल्याने त्यांनी माझा पाठलाग करून जीव वाचवला.
आरोपी चालकाचा अजब युक्तिवाद
दुसरीकडे आरोपी चालक रामचंद कुमार म्हणाला, त्यांनी आमच्यावर जबरदस्ती केली. माझ्या गाडीचा त्याच्या गाडीला धक्का देखील लागला नाही. तुम्ही दोन्ही वाहने बघा, गाडीचा थोडासा भागही तुटलेला किंवा खराब झालेला नाही. तसे असेल तर मी स्वतः दोषी होईल. संबंधित व्यक्तीने व त्याच्या साथीदाराने माझी गाडी बळजबरीने अडवली. मी गाडी चालवत होतो आणि त्याने जबरदस्तीने माझ्या गाडीच्या बोनेटवर उडी मारली. मी थांबलो पण तो खाली उतरत नव्हता. त्याने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.