आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar Murder । A Man Was Shot Dead After Eating Paan And Spitting Paan In Siwan, Bihar

धक्कादायक:पान खाणे बेतले जीवावर, बिहारच्या सीवानमध्ये पान खाऊन थुंकल्यानंतर एकाने केली गोळी झाडून हत्या

सीवानएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पान खाऊन थुंकल्यानंतर एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रागाच्या भरात एकाने गोळी झाडून हत्या केली असून, ही घटना बिहारच्या सीवान येथे घडली आहे. एका व्यापाऱ्याने आपल्या घरात पान खाऊन खिडकीतून थुंकले असता, ते खाली असलेल्या एकाच्या अंगावर उडाल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला.

हा वाद इतक्या प्रकोपाला पोहोचला की, आरोपीने त्या व्यापाऱ्याची गोळी झाडून हत्या केली. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडल्याची माहिती मिळत आहे. गोळी झाडल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरडोओरड केला त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी धाव घेतली असून, आरोपीला अटक केले आहे.

कपड्याचे व्यापार करत होता
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार मध्ये मृत्यू झालेल्याचे नाव एहसान मलिक असे असून, तो शाहगाजीपुरा येथील रहिवासी आहे. तो आपल्या मित्रांसोबत भाडेतत्वावर राहत होता. तसेच फेरी लावत कपडे विकायचा. एहसान रविवार रात्री आपल्या खोलीवर आल्यानंतर त्याने स्वयंपाकाला सुरुवात केली. त्याचदरम्यान तो पानाचा आस्वाद घेत होता. त्यानंतर त्याने खिडकीतून खाली थुंकले असता, ते खाली उभे असलेल्या युवकावर पडले.

त्याचा राग येत त्या युवकाने एहसानच्या खोलीकडे धाव घेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र त्याचदरम्यान वाद इतक्या प्रकोपाला गेला की, युवकाने एहसानची जागेवरच गोळी झाडत हत्या केली. विशेष म्हणजे हा आरोपी फक्त 18 वर्षाचा असल्याचे सांगितले जात आहे. पोलीसांनी त्यांला अटक केली असून, त्याने आपल्यावरील गुन्हा देखील मान्य केला आहे.

बातम्या आणखी आहेत...