आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारच्या भागलपूर जिल्ह्यातून श्रद्धाच्या हत्येसारखी घटना घडली आहे. इथे नीलम नावाच्या महिलेच्या शरीराचे अनेक अवयव कापून तिची हत्या करण्यात आली आहे. महिलेच्या गावातील शकील नावाच्या व्यक्तीने त्याच्या भावाच्या मदतीने महिलेचे हात, कान आणि स्तन कापले.
आरोपी तिचे पायही कापणार होते, पण कुणाची तरी चाहूल लागताच ते तिथून पळून गेले. महिलेचा शोध घेत तिला उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र जास्त रक्त वाहिल्याने तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. पोलिसांनी मुख्य आरोपी शकील आणि त्याचा भाऊ मोहम्मद जुद्दीनला अटक केली आहे. घटना शनिवारी पीरपैंती गावात घडली.
महिलेने रक्तबंबाळ अवस्थेत मुलाला सांगितली आपबिती
महिलेचा मुलगा कुंदनने सांगितले की, तो आईला सायकलवरून पीरपैंती बाजारात घेऊन गेला होता. घरी परतताना त्याने सिंघिया पुलापासून काही अंतरावर आईला सोडले आणि नंतर तो बाहा येथे थांबला. आई पायीच घरी जायला लागली. तेव्हा शकील आणि जुद्दीनने तिची हत्या केली.
जवळून जात असलेल्या एका व्यक्तीला महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यावर त्याने तिचा पती अशोक यादवला फोन केला. यादवने मुलाला याची माहिती दिली. मुलगा घटनास्थळावर दाखल झाल्यावर त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिने त्याच अवस्थेत सांगितले की, पीरपैंती बाजारातील शकीलने त्याचा साथीदारासह धारदार शस्त्राने तिचे अवयव कापले. कुणाची तरी चाहूल लागल्यावर ते पळून गेले.
पोलिसांनी शस्त्र जप्त केले
पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केले आहे. आरोपींनी कोंबडी कापण्याच्या चॉपरने महिलेचे अवयव कापले होते. पोलिसांनी आरोपींच्या घरातून शस्त्र जप्त केले आहेत. घटनास्थळावरून एक चप्पल आणि गमछा, फुटलेल्या बांगड्या आणि रक्ताने माखलेली माती सापडली आहे. पोलिसांनी पोस्टमार्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला आहे.
दुकानात येण्यापासून रोखल्याने हत्या
मृत महिलेचा पती अशोक यादवने सांगितले की, ते किराणा दुकान चालवतात. त्यांची पत्नी नीलमही दुकानात बसायची. मोहम्मद शकील कोणत्याही कामाशिवाय त्यांच्या दुकानावर यायचा. एके दिवशी पत्नी त्याला म्हणाली की, तुझे वागणे ठीक नाही, तु दुकानावर येत जाऊ नको.
शकील त्यानंतर दुकानात तर आला नाही. मात्र याचा राग त्याने मनात ठेवल्याचे अशोक म्हणाला. घटनास्थळापासून थोड्याच अंतरावर शकीलची शेती होती. तिथेच अशोकचेही शेत होते.
पैशांच्या देवाण-घेवाणीचा वादः पोलिस
पोलिस म्हणाले की, पैशांच्या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद सुरु होता. यातूनच ही हत्या झाली आहे. महिलेने आरोपीकडून काही पैसे घेतले होते. पैसे परत करण्याच्या कारणावरून एका महिन्यापूर्वीही दोघांमध्ये वाद झाला होता. शनिवारी याच कारणावरून आरोपींनी महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे, प्राथमिक तपासातून समोर आल्याचे पोलिस म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.