आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारच्या मुजफ्परपुरात एका डॉक्टरने शस्त्रक्रियेच्या नावाखाली एका महिलेच्या एक नव्हे तर दोन्ही किडन्या काढल्याची भयंकर बाब उजेडात आली आहे. या घटनेमुळे सर्वचजण थक्क झालेत.
मुजफ्फरपूरच्या सरकारी रुग्णालयात 3 मुलांच्या माता असणाऱ्या सुनीता देवी सध्या एका देवदूताच्या शोधात आहेत. एक असा देवदूत जो रुग्णालयात येऊन त्यांना स्वतःची किडनी दान म्हणून देईल. सुनीता देवींना जिवंत राहण्यासाठी एका किडनीची म्हणजे मूत्रपिंडाची गरज आहे. त्यांना ती वेळीच मिळाली नाही, तर त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण त्यांना त्यांच्या मृत्यूकडे घेऊन जाईल. त्यांच्या जीवनातील कोणता क्षण त्यांचा अखेरचा ठरेल, हे कुणीही सांगू शकत नाही.
शरीरात नाही एकही किडनी
कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात 2 किडन्या असतात. एखाद्या आजाराने एखादी किडनी खराब झाली, तर दुसऱ्या किडनीवर व्यक्ती आयुष्यभर जगू शकतो. याऊलट एखाद्या व्यक्तीच्या शरीरात एकही किडनी नसेल, तर तो व्यक्ती जीवंत राहणे फार अवघड असते. तो काही दिवसांचाच पाहुणा असतो. सुनीता देवींचेही असेच झाले आहे. त्यांच्या शरीरात सध्या एकही किडनी नाही.
डॉक्टरने काढल्या दोन्ही किडन्या
सुनीताला संसर्गामुले शहारातील बरियारपूर चौकातील शुभकांत नामक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती खालावली होती. डॉक्टर पवन कुमार यांनी त्यांच्या कुटुंबीयांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. कुटुंबीयही त्याला तयार झाले. पण शस्त्रक्रियेच्या बहाण्याने डॉक्टरने सुनीता यांची एक नव्हे तर दोन्ही किडन्या काढल्या. याची खबरबातही सुनीता किंवा त्यांच्या कुटुंबीयांना नव्हती.
प्रकृती खालावली
दोन्ही किडन्या काढल्यामुळे सुनीताची प्रकृती अधिकच खालावली होती. यामुळे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर पवन कुमार यांनी सुनीताला रुग्णवाहिकेने पाटण्याला उपचारासाठी पाठवले. तिथे त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांच्या दोन्ही किडन्या काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे सुनीता व त्यांच्या कुटुंबीयांच्या पायाखालची वाळूच सरकली.
डॉक्टर म्हणतो -चूक झाली
पीडित कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली असता डॉक्टर पवन कुमार पसार झाला. त्याने ही किडनी आपण चुकीने काढल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून तुरुंगात डांबले आहे. सध्या सुनीता यांच्यावर मुझफ्फरपूरच्या श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दर 2 दिवसांना त्यांचे डायलिसीस केले जाते. डायलिसीस केले तरच त्या जीवंत राहू शकतात. अन्यथा नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.