आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar Nawada Playing With Snake; Death Due To Bite | Cobra Snake In Nawada | Bihar

तरुणाचा नागाशी प्राणघातक खेळ,VIDEO:तरुणाने सापाचे घेतले चुंबन, गळ्यात अडकून गावभर फिरलाही; अखेर सर्पदंशाने मृत्यू झाला

नवादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या नवाद्यात कोब्रा साप चावल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण कोब्रा पकडून त्याच्याशी खेळत होता. तो कधी सापाच्या फन्याचे चुंबन घेई, तर कधी त्याच्यापुढे आपले डोके झुकवी. यावेळी अचानक सापाने त्याला दंश केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

या तरुणाचा विषारी नागाशी खेळण्याचा एक व्हिडिओही उजेडात आला आहे. त्यात तो आपल्या गळ्यात साप अडकवून गावभर फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर तो त्याच्याशी वेगवेगळ्या कुरापतीही करतो. त्याच्या या कृत्याचा गावच्या काही लोकांनी व्हिडिओ तयार केला. हा तरुण पूर्वीपासूनच साप पकडण्याचे काम करत असल्याचे सांगण्यात आले.

सापासोबतच्या स्टंटची काही छायाचित्रे पाहा...

नवादाच्या गोविंदपूर ठाणे हद्दीतील नारायणपूर गावात ही घटना घडली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, नारायणपूर गावचा देवचरण यादव यांचा 35 वर्षीय मुलगा दिलीप कुमार साप पकडण्याचे काम करत होता. त्याला आपल्या भागातील एका व्यक्तीच्या घरात साप आढळल्याची माहिती मिळाली होती. साप पकडण्यासाठी तो त्याच्या घरी गेला. त्याने साप पकडला. त्यानंतर तो त्याच्याशी खेळू लागला. त्यानंतर अचानक सापाने त्याला दंश केला.

लोकांनी सापाला जारमध्ये बंद केले

या घटनेनंतर स्थानिकांनी सापाला पकडून एका जारमध्ये बंद केले. त्यानंतर दिलीपकुमारला उपचारासाठी सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टर्सनी त्याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नवादाला रेफर केले. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात तरुण गळ्यात साप अडकवून फिरत असल्याचे व त्याचवेळी त्याला सर्पदंश होताना दिसून येत आहे.

सापाशी संबंधित दिव्य मराठीचे खालील वृत्त वाचा...

तोंडात कोब्रा टाकून स्टंट, VIDEO:सापाला गळ्यात टाकून गावभर फिरला; तेव्हाच सापाने केला दंश

प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक वाट्टेल ते करण्याची तयारी दर्शवतात. अगदी नको ते करतात. असाच विचित्र प्रकार एका व्यक्तीच्या चांगलाचा अंगाशी आला आहे. बिहारच्या सिवानमध्ये एका व्यक्ती कोब्रा गळ्यात टाकून फिरत होता. या जीवघेण्या खेळात क्रोबाने तरुणाच्या ओठावर चावा घेतला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...

बातम्या आणखी आहेत...