आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बिहारमध्ये भाजप आणि जदयूदरम्यान सुरू असलेल्या पावर वॉरमध्ये राजदने उडी घेतली आहे. राजदने त्यांचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी नितीश कुमारांवर नवा डाव टाकला आहे. माजी विधानसभा अध्यक्ष आणि राजदचे जेष्ठ नेते उदय नारायण चौधरी म्हणाले की, जर नितीश कुमार तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी समर्थन देतील. तर, आम्ही 2024 मध्ये त्यांना पंतप्रधान पदासाठी समर्थन देऊ.
हा प्रस्ताव देऊन राजदने एका बाणाने दोन शिकार करण्याचा प्रयत्न केला आहे. ते नितीश कुमारांच्या नेतृत्वात भाजपला केंद्रात आव्हान देतील आणि बिहारची सत्ता मिळवतील. बिहारचे विरोधी नेते तेजस्वी यादव यापूर्वीच दावा केला आहे की, बिहारमध्ये मध्यावधी निवडणूका होतील. तर, काँग्रेस खासदार अखिलेश प्रसाद सिंह म्हणाले की, भाजपकडून होत असलेल्या हेटाळणीनंतर नितीश कुमारांनी राजीनामा द्यावा.
कधीकाळी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नितीश यांच्याकडे पाहिला जायजे
एक काळ होता, जेव्हा नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पाहिले जायचे. पण, या शर्यतीत नरेंद्र मोदी यांनी त्यांना मात दिली. भाजप नेते सुशील मोदी यांनीही एकदा म्हटले होते की, नितीश कुमार 'पीएम मेटेरियल' आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.