आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar News; Doctors Reached The Brain Without Opening The Nasal Passages In IGIMS, Black Fungus Removed From The Brains Of 3 Patients

ब्लॅक फंगसचे विना टाका ऑपरेशन:मेंदुमध्ये पसरला होता म्यूकर माइकोसिस, पटणा IGIMS च्या डॉक्टरांनी नाकाद्वारे केले 3 रुग्णांचे ऑपरेशन

पटणा | मनीष मिश्रा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 तास चालले एका रुग्णाचे ऑपरेशन

कोरोना काळात ब्लॅक फंगस म्हणजेच (म्यूकर माइकोसिस)ने अनेकांची दृष्टी आणि जीव घेतला. अशाच ब्लॅक फंगस झालेल्या तीन रुग्णांचे बिहारच्या पाटण्यात ऑपरेशन करण्यात आले. विशेष म्हणजे, त्या तिघांचे ऑपरेशन एकही टाका न टाकता झाले आहे.

बिहारची राजधानी पाटण्यातील इंदिरा गांधी वैद्यकीय संस्थे(IGIMS)त ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांवर चिरफाड न करता नाकाद्वारे ऑपरेशन झाले. सध्या तिन्ही रुग्णांची प्रकृती ठीक आहे. IGIMS चे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर मनीष मंडल यांनी सांगितले की, त्या रुग्णांच्या मेंदुमध्ये ब्लॅक फंगसचा संसर्ग झाला होता. लवकरच ऑपरेशन केले नसते, तर जीवाचा धोका होता. हे ऑपरेशन अवघड होते. पण, मोठे शर्तीचे प्रयत्न करुन नाकाद्वारे हे ऑपरेशन करण्यात आले.

3 तास चालले ऑपरेशन
IGIMS च्या ENT विभागाचे HOD डॉ. राकेश सिंह सांगतात की, नाकाद्वारे मेंदुतील फंगस काढणे अवघड काम होते. मेंदुच्या फ्रंटल लोबमध्ये फंगस पसरले होते. हे फंगस नाकाद्वारे काढले. एका ऑपरेशनमध्ये कमीत कमी तीन तासाचा वेळ लागला.

एका रुग्णाची दृष्टी गेली
IGIMS मध्ये एका अशा रुग्णाचे ऑपरेशन करण्यात आले, ज्याच्या अर्ध्या मेंदुमध्ये फंगस पसरले होते. ऑपरेशननंतर त्याच्या एका डोळ्याची दृष्टी गेली, पण डोळा काढण्याची गरज पडली नाही.

बातम्या आणखी आहेत...