आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar News । In Bihar, 21 People Died Due To Poisoning And 16 Were In Critical Condition

धक्कादायक:बिहारमध्ये विषारी दारूचे सेवन केल्याने 21 जणांचा मृत्यू तर 16 जणांची प्रकृती चिंताजनक, मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता; परिसरात शोककळा

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारमध्ये विषारी दारूचे सेवन केल्याने अवघ्या दोन दिवसात 21 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर 16 जण अतिगंभीर अवस्थेत आहेत. मृतांमध्ये गोपालगंज येथील 13 जण तर बेतिया येथील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दोन्ही ठिकाणातील सुमारे 16 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील तीन जणांच्या डोळ्यांची दृष्टी गेली आहे. या सर्वांनी विषारी दारू पिल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणातील गंभीर रुग्णांवर मोतिहारी रुग्णालयात उपचार सुरू असून, मृतांमध्ये कुशहर, महम्मदपुर, मंगोलपुर, बुचेया आणि रसौली या गावातील नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांनी मंगळवारी दारूचे सेवन केले होते. त्यानंतर अचानक त्यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गावातील काही नागरिकांशी विचारपूस केली असता बुधवार संध्याकाळपर्यंत सुमारे आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर गुरुवारी सकाळी पुन्हा पाच जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या 13 इतकी झाली आहे. मात्र सरकारने मृतांबाबत कोणताही आकडा सध्या जारी केलेला नाही.

संशयास्पद घटना
बेतिया गावातील काही जणांनी म्हटले आहे की, बुधवारी सायंकाळी काही जणांनी गावठी दारूचे सेवन केले होते. त्यानंतर काही तासातच त्यांची प्रकृती ढासाळायला लागली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान आठ जणांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कारण अनेक जणांनी या गावठी दारूचे सेवन केले होते. सध्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर सत्यता कळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...