आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar News; Mob Lynching Of Bihar Police Inspector Kishanganj Town SHO In West Bengal When He Crosses State Border In Search Operation

बंगालमध्ये पोलिसाची मॉब लिंचिंग:चोराचा पाठलाग करताना चुकून बंगालमध्ये गेले, जमावाच्या मारहाणीत बिहार पोलिसाचा मृत्यू

किशनगंज2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्य आरोपीसह तिघांना अटक

बिहारमधील किशनगंज नगरच्या पोलिस अधिक्षाकाचा बंगालमध्ये जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी 3 वाजता पोलिस अधिक्षक अश्विनी कुमार गाडी चोरांचा पाठला करत असताना चुकून बंगालमध्ये दाखल झाले. बंगालचा हा परिसरत किशनगंज शहरापासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडी चोरणाऱ्या टोळीचा पाठलाग करत असताना किशनगंज पोलिस स्टेशनचे पथक चुकून बंगालमध्ये दाखल झाले. रात्री काळोख असल्यामुळे त्यांना सीमेचा अंदाज आला नाही. पोलिसांचे पथक बंगालमध्ये दाखल झाल्याचे कळताच आरोपींनी त्यांच्या परिसरात अफवा पसरवली की, बिहार पोलिस बंगालमध्ये दंगली घडवण्यासाठी आले आहेत. हे ऐकून त्या परिसरातील नागरिक नाराज झाले आणि त्यांनी बिहार पोलिसांच्या पथकाला घेरले. यावेळी इतर पोलिस पळून जाण्यात यशस्वी झाले, पण एसएचओ अश्विनी कुमार जमावाच्या तावडीत सापडले. यावेळी जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्या परिसरात ही घटना घडली, तो परिसर गोलपोखर विधानसभा क्षेत्रातील असून, 22 एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

मुख्य आरोपीसह तिघांना अटक

या घटनेनंतर पूर्णियाचे IG सुरेश प्रसाद आणि किशनगंजचे SP कुमार आशीष बंगालच्या इस्लामपुरमध्ये आले आणि मृत अश्विनी कुमार यांचे पार्थिव पोस्टमॉर्टमनंतर किशनगंजला पाठवण्यात आले. पूर्णियाचे IG सुरेश प्रसाद यांनी सांगितले की, गोपांतापाडा गावात मॉब लिंचिंगची घटना घडली. बंगाल पोलिसांच्या मदतीने छापेमारी सुरू आहे. तर, SP कुमार आशीष यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या पांजीपाडा पोलिसांनी फिरोज आलम नावाच्या एका व्यक्तीला पकडले आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...