आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar News; Positive Story Of Negative Phase; Loss Of One Day Daughter Corona In Patna AIIMS; Positive With Birth, Victory Over Pi Corona Before Mother; News And Live Updates

नकारात्मक काळातील सकारात्मक स्टोरी:पटना AIIMS मध्ये जन्म घेताच पॉझिटिव्ह आली मुलगी, परंतु 5 दिवसात कोरोनाले केले पराभूत

पटनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना वेळेपूर्वीच डिलिव्हरी करावी लागली.

देशात कोरोना महामारीमुळे नवीन रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे देशभरातून नकारात्मक बातम्या मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. अशातच पटनातील एम्स रुग्णालयात एका कोरोनाबाधीत गर्भवती महिलेने एका मुलीला जन्म दिला आहे. दरम्यान, ती मुलगी जन्मताच पॉझिटिव्ह आली असून तीच्या आईने आठ महिन्यांतच जन्म दिला आहे. परंतु, कमजोर वाटणार्‍या मुलीने पाच दिवसांतच कोरोनाला पराभूत केले आहे. आता ती आपल्या आजीजवळ असून तीच्या आईचा रिपोर्ट अद्याप नेगेटिव्ह आलेला नाही. सध्या तीच्यावर पटना येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुगलसरायच्या आनंद शर्मा यांची पत्नी संगीता शर्मा गर्भवती होती. परंतु, आठव्या महिन्यादरम्यान संगिताला खोकला, सर्दी झाली. त्यामुळे त्यांनी डॉक्टराकडून फोनवर उपचार घेणे सुरू केले, परंतु आजार कमी होण्याऐवजी वाढतच राहिले. अशातच घरातील लोकांनी घाईघाईने संगीताला आरा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

8 महिन्यांच्या आतच झाली डिलीव्हरी
संगीताचा भाऊ अंजय यांनी सांगितले की, 27 एप्रिल रोजी ते संगिताला घेऊन पाटणा एम्स येथे पोहोचले. दरम्यान, प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु, जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना वेळेपूर्वीच डिलिव्हरी करावी लागली. बर्‍याच प्रयत्नांनंतर डॉक्टरांनी 30 एप्रिल रोजी सामान्य प्रसूती केली.

मुलगी जन्म घेताच पॉझिटिव्ह आली
संगिताने एका मुलीला जन्म देताच ती पॉझिटिव्ह आली. परंतु, सर्वाना असे वाटायचे की, तीचा रिपोर्ट नेगेटिव्ह येईल. त्‍यानंतर पटना एम्सने त्या मुलीची नोंदणी करत 1 मे ला कोविड केअर युनिटमध्ये खास देखरेखीखाली ठेवले. परंतु तीने अवघ्या 5 दिवसातच कोरोनाचा विषाणूचा पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...