आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar News | The No. Of Died People Has Increased To 17 In Gopalganj Poisonous Liquor Case

बिहारमध्ये बनावट दारूमुळे आतापर्यंत 33 जणांचे बळी:गोपालगंजमध्ये 18 आणि बेतियामध्ये 15 जणांचा मृत्यू; दोन पोलिस आणि एका चौकीदाराला करण्यात आले निलंबित

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारमधील दोन जिल्ह्यांमध्ये तीन दिवसांत बनावट दारूमुळे 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये 18 गोपालगंज येथील रहिवासी आहेत. येथील 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यामध्ये 3 जणांची दृष्टी गेली आहे. पश्चिम चंपारणमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

अद्याप शवविच्छेदन अहवाल न आल्याने प्रशासन त्यांचा संशयास्पद मृत्यू मानत आहे. DM यांनी अद्याप मद्यपानामुळे मृत्यू झाल्याचा दुजोरा दिला नाही. मात्र मद्यपान केल्यानेच तब्येत बिघडली आणि नंतर मृत्यू झाल्याचे मृतांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी गोपालगंजचे एसपी आनंद कुमार यांनी महमदपूर पोलिस स्टेशनचे प्रमुख शशी रंजन कुमार आणि एका चौकीदाराला निलंबित केले आहे, तर पश्चिम चंपारणचे नौतन ठाणेदार आणि चौकीदार यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे पथक परिसरात छापे टाकत आहे. गोपालगंजमधील तीन घरे सील करण्यात आली आहेत, तर तुर्हा टोला येथील छोटेलाल साह, अशोक शर्मा, रामप्रवेश साह आणि जितेंद्र प्रसाद या चार व्यावसायिकांना अटक करण्यात आली आहे. गोपालगंज प्रशासनाने 11 मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहे, तर सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, इतर 7 मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनाला न कळवता अंत्यसंस्कार केले.

असे आहे संपूर्ण प्रकरण
गोपालगंजच्या महमदपूर पोलिस ठाण्याच्या कुशाहर तुर्हा टोला आणि दलित बस्तीमध्ये मंगळवारी संध्याकाळी दोन डझन लोकांनी बनावट दारू प्यायली. दारू पिल्यानंतर प्रकृती बिघडू लागली. पोटात जळजळ आणि तोंडातून फेस आल्यावर नातेवाईकांनी स्थानिक रुग्णालय आणि सदर रुग्णालयात धाव घेतली, जिथे बुधवारी 10 जणांचा मृत्यू झाला, तर इतरांचा गुरुवारी मृत्यू झाला. अशा स्थितीत मृतांचा आकडा 18 वर पोहोचला आहे.

पश्चिम चंपारणमध्ये बुधवारी संध्याकाळी काही लोकांनी गावात देशी दारू प्यायली. रात्री उशिरा त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 15 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. डीएम कुंदन कुमार म्हणतात की हे प्रकरण संशयास्पद वाटत आहे. वैद्यकीय पथक पाठवून तपास केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...