आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bihar Politics Update | RJD Party Vice President Raghuvansh Prasad Singh Resignation Today News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार:लालू प्रसाद यादव यांना मोठा धक्का, पक्षाचे उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह यांचा राजीनामा

पटनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बिहार विधानसभा निवडणूका जवळ येत असल्यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. मंगळवारी राजदला एका मागे एक दोन मोठे धक्के बसले. पाच विधान परिषद आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर आता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. परंतू, पक्षाने त्यांचा राजीनामा अद्याप स्विकारला नाही.

राजदच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशालीचे माजी खासदार रामा सिंह यांना पक्षात घेण्यावरुन रघुवंश प्रसाद सिंह नाराज आहेत. रामा यांनी काही दिवसांपूर्वी तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या पक्षात येण्याच्या चर्चा सुरू झाल्या. रामा 29 जूनला राजदमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यावरुनच रघुवंश नाराज होते.

2014 समोरा-समोर होते रघुवंश आणि रामा सिंह

राजदच्या तिकीटावर रघुवंश वैशाली लोकसभा मतदारसंघातून चारवेळा खासदार झाले आहेत. 2014 मध्ये रघुवंश यांनी राजद आणि रामा यांनी लोजपाच्या तिकीटावर लोकसभा लढवली. तेव्हा रघुवंश यांचा पराभव झाला होता. 2019 मध्ये लोजपाने रामा यांना तिकीट दिले नव्हते. तेव्हा राजदने रामा यांना आपल्या पक्षात घेण्याचा विचार केला होता, पण रघुवंश यांच्या विरोधापुढे पक्षाला झुकावे लागले.

पक्ष विजयी उमेदवारांच्या शोधात

बिहार विधानसभा निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होत आहेत. अशा परिस्थितीत राजद विजयी उमेदवारांच्या शोधात आहे. यामुळे राजदने रामा यांना पक्षात घेण्याची तयारी केली आहे. यामुळेच रघुवंश नाराज झाले आणि राजीनामा दिला.

बातम्या आणखी आहेत...