आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रील्स बनवून इन्स्टावर टाकली,15 मिनिटांनी रेल्वेने उडवले:खगरियात 2 मित्रांचा मृत्यू; तिसऱ्याने पुलावरून उडी मारून वाचवला स्वतःचा जीव

खगरियाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
नितीशने ही रील्स आपल्या मृत्यूपूर्वी काही मिनिटे अगोदर इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केली होती. 

बिहारच्या खगरियात रेल्वे पुलावर रील्स तयार करणाऱ्या 2 मित्रांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला आहे. तर तिसऱ्या मित्राने पुलावरून सूखी नदीत उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. हे तिघेही रेल्वे ट्रॅकवर रील्स तयार करत होते. यापैकी 3 रील्स या मुलांनी इन्स्टावर अपलोड केल्या होत्या.

ही दुर्घटना 1 जानेवारी म्हणजे नववर्षाच्या पहिल्या दिवशी घडली. तत्पूर्वी, त्यांनी '2022 में औकात दिखाने वालों 2023 में बचकर रहना' या गाण्यासह एक रील इन्स्टावर अपलोड केली होती. पण त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच रील्स बनवताना त्यांना रेल्वेने उडवले.

रेल्वे 2 मित्रांना धडक देऊन पुढे निघून गेली. तिसरा मित्र काही अंतरावरून हे पाहत होता. त्याने ट्रेन पाहताच पुलावरून नदीत उडी मारली. त्यात त्याचे हात-पाय मोडले. जखमी मित्राने सांगितले की, धुक्यामुळे आम्हाला रेल्वे दिसली नाही. त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तिघांचेही वय 15 ते 17 वर्ष वयोगटातील आहेत.

जखमी तरुणाचे नाव अमन कुमार आहे. तर नितीश कुमार व सोनू कुमार ही मृतांची नावे आहेत. सोनू हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या आई-वडिलांची प्रकृती बिघडली आहे.

ही रील्स अपलोड केल्यानंतर 15 मिनिटांतच दोघांना रेल्वेने उडवले.
ही रील्स अपलोड केल्यानंतर 15 मिनिटांतच दोघांना रेल्वेने उडवले.

मृत्युपूर्वी इन्स्टावर अपलोड केला होता फोटो-व्हिडिओ

मृत्युपूर्वी 15 मिनिटे अगोदर या मुलांनी आपल्या इन्स्टा अकाउंटवर गाण्यासह सेल्फी व व्हिडिओ अपलोड केला होता. त्यानंतर पुन्हा रील्स तयार करण्यासाठी ते रेल्वे पुलावर गेले होते. त्यांना धुक्यामुळे रेल्वे येताना दिसली नाही. नितीश व सोनू यांना जानकी एक्सप्रेसने धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

रेल्वे ट्रॅकवर रील्स बनवण्याचे अनेक व्हिडिओ आढळले

नितीश यांच्या इन्स्टावर तिघांनी यापूर्वी तयार केलेल्या अनेक रील्स आढळल्या. यातील बहुतांश रील्स रेल्वे ट्रॅक किंवा रेल्वे पुलाच्या खाली तयार करण्यात आल्या आहेत.

ट्रॅकवर पुढे बसलेला सोनू कुमार व मागे नितीश कुमार. हे छायाचित्रे जुने आहे. ते नितीशच्या इन्स्टावरून घेण्यात आले आहे.
ट्रॅकवर पुढे बसलेला सोनू कुमार व मागे नितीश कुमार. हे छायाचित्रे जुने आहे. ते नितीशच्या इन्स्टावरून घेण्यात आले आहे.

2013 मध्ये 35 भाविकांचा झाला होता मृत्यू

रविवारी ज्या ठिकाणी जानकी एक्सप्रेसच्या धडकेत 2 तरुण ठार झाले, त्यापासून अवघ्या 1.5 किमी अंतरावरील धमारा घाट स्टेशनवर 2013 मध्ये राज्यराणी सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या धडकेमुळे 35 भाविकांचा जागीच मृत्यू झाला होता.

जखमी अमनने सांगितले की, धुक्यामुळे आम्हाला रेल्वे येत असल्याचे दिसले नाही.
जखमी अमनने सांगितले की, धुक्यामुळे आम्हाला रेल्वे येत असल्याचे दिसले नाही.

जखमीने अपघाताचे असे वर्णन केले...

जखमी अमनने सांगितले की, मी, सोनू व नितीश नववर्षानिमित्ताने धमारा घाट स्टेशनलगतच्या माता कात्यायनी मंदिरात पूजा करण्यासाठी गेलो होतो. रेल्वे बांधावर जास्त गर्दी होती. त्यामुळे आम्ही शॉर्टकट मार्गाने रेल्वे पुलावरून मंदिरात जाऊ लागलो. रस्त्यात अचानक सोनू व नितीश यांनी रील्स तयार करू लागले. धुके जास्त होते. त्यामुळे रेल्वे केव्हा आली हे आम्हाला समजलेच नाही.

मानसी पोलिस ठाण्याचे प्रभारी निलेश कुमार यांनी पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आल्याचे सांगितले. सेल्फी घेणे व रील्स तयार करण्याच्या नादात दोघांचा बळी गेला.

बातम्या आणखी आहेत...