आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराध्वनी प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, याबाबत आपण अनेकदा ऐकले असेल. पण ध्वनी प्रदूषणामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो, हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण बिहारच्या सीतामढी याठिकाणी अशीच एक घटना घडली आहे. डीजेचा मोठा आवाज नवऱ्या मुलाच्या मृत्यूचे कारण ठरला.
नवरदेवाला स्टेजवरच अस्वस्थ वाटू लागले आणि नंतर तो बेशुद्ध पडला. नवरदेवाला दवाखान्यात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वधू-वराच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याठिकाणी डीजेवर बंदी आहे. तरीही मोठ्या आवाजात डीजे वाजवला जात होता.
सुरेंद्र कुमार (30) असे मृताचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सोनबरसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंदरवा गावातील ही घटना आहे. नवऱ्या मुलाने अनेकदा डीजे बंद करण्यास सांगितले. मात्र, लोकांच्या निष्काळजीपणामुळे जयमाल संपताच नवरदेव अचानक स्टेजवर बेशुद्ध पडला. या घटनेनंतर नातेवाइकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती ढासळू लागली. यानंतर त्यांना सदर रुग्णालयात रेफर करण्यात आले. वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
स्थानिकांनी सांगितले की, जयमल स्टेजवर आल्यानंतर दोघेही नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्रांसोबत फोटो काढत होते. दरम्यान, अचानक नवरा मुलगा बेशुद्ध अवस्थेत खाली पडली. तो पडताच गोंधळ उडाला. सगळे इकडे तिकडे धावू लागले. वराच्या बाजूने आलेले लोक जेवण न करताच परतले. सुरेंद्र हा भावांमध्ये सर्वात लहान होता, डीजे बंद केला असता तर त्याचा मृत्यू झाला नसता, असे नातेवाइकांनी म्हटले. सुरेंद्र रेल्वे ग्रुप डी ची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. सुरेंद्रच्या सांगण्यावरून डीजे बंद केला असता तर कदाचित ही घटना घडली नसती, असे स्थानिक लोक वारंवार सांगत होते.
सोनबरसा ब्लॉक मेडिकल ऑफिसर कन्हैया कुमार यांनी सांगितले की, 75 डेसिबलपेक्षा जास्त आवाज करण्यास बंदी आहे. यापेक्षा मोठा आवाज कोणासाठीही धोकादायक ठरू शकतो. डीजे-बँड वाद्यांचा मोठा आवाज आणि लख्ख दिवे यामुळे लोक डिप्रेशनमध्ये जातात. अशा परिस्थितीत अस्वस्थता असते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होऊ शकतो.
नातेवाईकांच्या लग्नात आवडीच्या गाण्यावर थिरकत होता, हार्ट अटॅकने मृत्यू
तेलंगणातील नांदेडमध्ये एका तरूणाचा डान्स करताना अचानक खाली कोसळून मृत्यू झाला. लग्नात नाचणाऱ्या या 19 वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला झाला. ही घटना 25 फेब्रुवारीची असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हैदराबादपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या निर्मल जिल्ह्यातील पारडी गावातील ही घटना आहे. महाराष्ट्रातील रहिवासी असलेला हा तरूण त्याच्या नातेवाईकांच्या घरी लग्नासाठी या ठिकाणी आला होता. येथे वाचा संपुर्ण बातमी.
लग्नात नवऱ्या मुलाला लावत होता हळद; हसतं-खेळतं वातावरण अचानक दुःखात बदलले
हैदराबादमध्ये ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्या मुलाला हळद लावताना एका व्यक्तीला अचानक ह्रदयविकाराचा धक्का आला आणि तो जागेवरच कोसळला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मोहम्मद रब्बानी असे या 40 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. रब्बानी गुलजार हाऊस येथे दागिन्यांच्या दुकानात काम होते. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. लग्नघरात मृत्यू झाल्याने संपुर्ण कुटुंबावर शोककळा पसरली असून हसतं-खेळतं वातावरण अचानक दुःखात बदलले आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.