आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक वाट्टेल ते करण्याची तयारी दर्शवतात. अगदी नको ते करतात. असाच विचित्र प्रकार एका व्यक्तीच्या चांगलाचा अंगाशी आला आहे. बिहारच्या सिवानमध्ये एका व्यक्ती कोब्रा गळ्यात टाकून फिरत होता. या जीवघेण्या खेळात क्रोबाने तरुणाच्या ओठावर चावा घेतला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
जिल्ह्यातील मैरवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तित्रा गावात मंगळवारी ही घटना घडली. इंद्रजित राम (30) असे तरुणाचे नाव आहे. तरुण दारूच्या नशेत होता, असे गावकऱ्यांनी सांगितले. तो घराजवळील विटा काढत होता, इतक्यात विटांमधून एक क्रोबा बाहेर आला. काही लोकांनी क्रोबावर डिझेल ओतले. यामुळे क्रोबा काही काळ बेशुद्ध झाला.
इंद्रजितने क्रोबाला पकडून समोर ठेवले आणि त्याच्याशी जोरा-जोरात बोलू लागला. मग क्रोबासमोर तरुणाने मस्तक टेकवले. यादरम्यान लोकांची गर्दी जमली. लोकांना आपण किती साहसी आहोत हे दाखवण्यासाठी तो सापाला घेऊन अंगाखांद्यावर खेळवू लागला.
कधी गळ्यात तर कधी हातात धरुन तो गावात फिरत होता आणि म्हणत होता की, जर सापाने माझ्या तोंडात विष टाकले तर मी मरून जाईल. हे माझे गुरु आहेत. असे म्हणत तो पुन्हा-पुन्हा सापाला तोंडात टाकत होता. असे त्याने एकदा-दोनदा नव्हे तर 3-4 वेळा असे केले. यातच तो क्रोबाचा फणा आपल्या तोंडात टाकून लोकांना कर्तब दाखवू लागला. पण, सापाने त्याला दंश केला. यानंतर स्थानिक लोकांनी त्यांना तातडीने सिवान सदर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
साप चावल्यास काय करावे? आढळल्यास काय करावे? जाणून घ्या सविस्तर...
. जगभरात विषारी सापांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी अर्धे मृत्यू भारतात होतात. यामागील सर्वात मोठे कारण हे आहे की साप चावल्यानंतर केवळ 30% भारतीय उपचारांसाठी रुग्णालयात जातात. अनेकदा लोकांना घर किंवा दुकानातच साप चावतो. काही उपाय असे आहेत, ज्यामुळे तुमच्या घरात साप शिरण्याची शक्यता कमी होते. आज कामाच्या गोष्टीत चर्चा करूया, साप चावल्यानंतर काय करावे आणि काय नाही. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.