आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बहुत मोहब्बत किए थे जाहिद आपसे’, पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या:नववधूप्रमाणे नटून घेतला जगाचा निरोप

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका महिला शिक्षिकेने विष घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी महिलेने एक व्हिडिओही जारी केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पतीवर खूप प्रेम आहे. मात्र, त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे तिने सांगितले.

आत्महत्या करण्यापुर्वी संबंधित महिला नववधूसारखी नटल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. मृत्यूनंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. 22 वर्षीय अजमा असे मृत शिक्षकाचे नाव असून तिचे मोहम्मदसोबत लग्न झाले होते. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे. पीडित महिलेच्या वडिलांनी म्हटले की, न्याय मिळाल्यावर तिच्या आत्मयाला शांती मिळेल. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि पतीला शिक्षा झाली पाहिजे.

या प्रकरणाबाबत डीएसपी टाऊन राघव दयाल यांनी सांगितले की, सल्फास घेतल्याने शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे पोलिस पतीविरुद्ध पुढील कारवाई करत आहेत. या घटनेतील प्रत्येक मुद्द्याची चौकशी करत कारवाई करण्यात येत आहे.

पती-पत्नीने 5 मुलांसह घेतली कालव्यात उडी

पती-पत्नीने आपल्या 5 मुलांसह नर्मदा कालव्यात उडी घेतल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील सांचोरमध्ये घडली. 9 वर्षीय प्रकाशचा मृतदेह दुपारी चारच्या सुमारास बाहेर काढण्यात आला असून उर्वरितांचा शोध सुरू आहे. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. गोताखोरांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. तर जोधपूरमधून एसडीआरएफच्या 2 पथकांनाही पाचारण करण्यात आले आहे. येथे वाच संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...