आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारच्या जयनगरहून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला जाणाऱ्या पवन एक्सप्रेसमध्ये 2 टीटीईंनी एका प्रवाशाला बेदम मारहाण केली. रेल्वेतीलच एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीटीई गौतम कुमार पांडे व नरेश कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, पीडित प्रवाशी विना तिकीट प्रवास करत होता. या प्रकरणी दंड आकारल्याने प्रवाशी व टीटीईत वाद झाला. प्रथम दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यात टीटीईने प्रवाशाला बेदम मारहाण केली.
5 छायाचित्रांतून समजून घ्या संपूर्ण कहाणी...
हे दोन्ही टीटीई समस्तीपूर रेल्वे मंडळाच्या जयनगर स्टेशनवर कार्यरत आहेत. त्यांना डीआरएम आलोक अग्रवाल यांच्या निर्देशांनुसार सीनियर डीसीएम चंद्रशेखर प्रसाद यांनी तत्काळ प्रभावाने निलंबित केले. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. हा व्हिडिओ 2 जानेवारीचा आहे.
व्हिडिओत काय...
व्हिडिओत दिसून येत आहे की, रेल्वेच्या जनरल बोगीत वरच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाचा दोन्ही टीटीईंशी वाद झाला. त्यानंतर दोघांनी प्रथम आपले ओळखपत्र काढले व नंतर बॅग समोरच्या सीटवर ठेवली. त्यानंतर टीटीई गौतम कुमार पांडे व नरेश कुमार यांनी प्रवाशाला मारहाण सुरू केली.
प्रथम दोघांनी मिळून प्रवाशाला वरच्या सीटवरून ओढून खाली पाडले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण केली. यावेळी रेल्वेतील इतर प्रवाशांनी टीटीईंना त्याला सोडण्याची विनंती केली. पण त्यांनी ते त्याला मारहाण करतच राहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.