आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bihar | Us President Donald Trump Daughter Ivanka Trump Hailed Bihar Darbhanga Girl Jyoti Kumari 1200

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायकलवर 1200 किमीचा प्रवास:अमेरिकेच्या राष्ट्रपतींची मुलगी इवांका ट्रम्प यांनी बिहारच्या ज्योतीचे केले कौतुक, म्हणाल्या - यातून भारतीय लोकांच्या भावना दिसतात

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 वर्षीय ज्योतीने तिच्या जखमी वडिलांना सायकलवर गुरगावहून दरभंगाला आणले होते
  • सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला पुढच्या महिन्यात ट्रायलसाठी बोलावले

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आणि सल्लागार इवांका ट्रप्म यांनी बिहारच्या 15 वर्षीय ज्योतीच्या शौर्याचे कौतुक केले आहे. ज्योतीने तिच्या जखमी वडिलांना सायकलवर बसवून 1200 किलोमीटरचा प्रवास केला होता. ती 7 दिवस सायलक चालवत घरी पोहचली होती. इवांकाने म्हटले की, ज्योतीने जे केले ते हे सहनशीलता आणि आपल्या प्रियजनांवरील प्रेमाचे एक सुंदर उदाहरण आहे. यातून भारतीय लोकांच्या भावना दिसतात. 

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला ट्रायलसाठी बोलावले

ज्योतीचे उत्साह पाहून सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने तिला चाचणीसाठी बोलावले आहे. जर चाचणी यशस्वी झाली तर फेडरेशनच्या खर्चाने ज्योती यांना दिल्लीतील राष्ट्रीय सायकलिंग अकादमीमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल. ज्योती सांगते की या ऑफरमुळे मी खूप खूष असून पुढच्या महिन्यात ट्रायलसाठी जाणार आहे. 

लॉकडाऊन होण्यापूर्वी ज्योती वडिलांकडे गेली होती

ज्योतीची वडील मोहन पासवान गुडगावमध्ये रिक्षा चालवतात. ज्योती मार्च महिन्यात वडिलांकडे गेली होती. यानंतर देशभरात लॉकडाउन झाला. यादरम्यान तिचे वडील एका अपघातात जखमी झाले. यामुळे त्यांचे काम बंद झाले, जवळ पैसे नव्हते, त्यात घरमालक घरातून काढण्याची धमकी देत होता.  बाप-लेकीचे जेवणाचे हाल होत होते. यामुळे ज्योतीने वडिलांना घेऊन घरी जाण्याचा निश्चिय केला. ज्योतीचे घर दरभंगाच्या सिरहुल्ली गावात आहे.  

बातम्या आणखी आहेत...