आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बुधवारी बिहार विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 20 व्या दिवशी पोलिस कायदा बिल 2021 च्या विरोधात जोरदार गदारोळ झाला. सभागृहाची कारवाई 4 वेळा तहकूब झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष विजय सिन्हा यांना त्यांच्याच सभागृहात बंदी बनवले. यावेळी विरोधी आमदारांची DM आणि SSP सोबत धक्काबुक्कीदेखील झाली. यानंतर एक-एक करत विरोधी आमदारांना सुरक्षा रक्षांनी सभागृहाच्या बाहेर पेकले. यादरम्यान, मकदुमपुरचे राजदचे आमदार सतीश कुमार दास बेशुद्ध झाले.
विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरबाहेर पोलिस तैनात
कारवाई सूरू झाल्यानंतर डॉ. प्रेम कुमार सभापती बनले, यावेळी विरोधी पक्षातील 12-13 आमदार वेलजवळ गेले आणि विधेयक फाडले. यानंतर कारवाईला 5:30 पर्यंत स्थगित करण्यात आले. सध्या विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा आपल्या चेंबरमध्येच बसले आहेत. त्यांच्या चेंबरबाहेर पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.
विरोधी आमदारांनी टेबल तोडला
यापूर्वी विरोधकांच्या गोंधळामुळे कारवाई चारवेळा स्थगित करावी लागली. कारवाईदरम्यान विरोधी आमदार वेलमध्ये आले आणि त्यांनी विधेयकाची प्रत फाडली. यादरम्यान ते रिपोर्टर टेबलावर चढले आणि टेबलही तोडला. दुसऱ्यांदा कारवाई सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्याकडून CAG रिपोर्ट सादर करताना RJD आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला. यावेळी विरोधकांनी खुर्च्या आदळल्या. विरोध वाढल्यानंतर मार्शल सभागृहात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.