आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाजपा कार्यकारिणी बैठकीच्या दुसर्या दिवशी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले, 'नितीशकुमार यांच्या नेतृत्वात बिहारची निवडणूक लढविली जाईल. भाजप, जेडीयू आणि एलजेपी एकत्र निवडणुका लढवतील आणि जिंकतील. आपल्याला केवळ भाजपचीच नव्हे तर आपल्या मित्रपक्षांच्या मूल्यांचीही काळजी घ्यावी लागेल' असे ते म्हणाले.
नड्डा म्हणाले, 'बिहार विधानसभेच्या निवडणुका कोरोना काळात होणार आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला एनडीएचा संदेश घरात घरोघरी पोचवावा लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे फिजिकल डिस्टेंसिंगसह आपल्याला हे करावे लागणार आहे. पक्षातील नेत्यांनी हे ठरवावे की, समाजातील सर्व वर्गांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहार सरकारचा संदेश पाहोचला पाहिजे.'
नीतीश सरकारसाठी लोजपाचे कठोर धोरण
नीतीश सरकारविषयी लोजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान काही दिवसांपासून टीकात्मक भाष्य करत आहेत. गेल्या आठवड्यात ते म्हणाले होते की, राज्यातील मुद्दे मांडत राहतील. याला कोणी टीका समजली तर काहीच करता येणार नाही. पक्ष राज्यातील लोकांसाठी आपली जबाबदारी पार पाडत राहिल. आम्ही राजधर्माचे पालन करत राहू.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.