आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारमधील सासारामच्या मुरादाबाद कालव्यात अचानक नोटांची बंडले तरंगताना लोकांना आढळली. कालव्यात नोटा सापडत असल्याने एकच खळबळ उडाली होती. हा पैसा लुटण्यासाठी लोकांनी कालव्यात उड्या मारल्या. काहींनी एका हाताने तर काहींनी दोन्ही हातांनी नोटांची बंडले उचलण्यास सुरुवात केली. हाताला जेवढे लागतील तेवढे घेऊन लोक कालव्याबाहेर पडताना दिसले.
कालव्यातून नोटांचे बंडल लुटल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की लोक कॅनॉलमध्ये 10-10 रुपयांच्या नोटांचे बंडल जमा करत आहेत. कुणी कालव्यातून बाहेर काढत आहे, तर कुणाचा नातेवाइक टॉवेल घेऊन काठावर उभा आहे. ज्यामध्ये तो नोटा ठेवत आहे. पैशांच्या या लुटीचा व्हिडिओ वेगाने शेअर होत आहे.
हे रुपये खरे आहेत की खोटे, याची खात्री सध्या पोलिसांना करता आलेली नाही. या नोटा खऱ्या असल्याची स्थानिक लोकांमध्ये चर्चा असली तरी त्यावर ते उघडपणे बोलत नाहीत. मफसिल पोलिस स्टेशनचे इंचार्ज रिझवान अहमद यांनी सांगितले की, नोटा मिळाल्याच्या माहितीवरून पोलिस घटनास्थळी गेले होते, तेथे काहीही आढळले नाही. कालव्यात नोटा मिळाल्याबद्दल लोक बोलत आहेत. पुढील तपास सुरू आहे.
अंघोळ करताना कोणीतरी पैसे पाहिले
कापडात बांधलेले नोटांचे बंडल 10 रुपयांचे असल्याचे गावकऱ्याने सांगितले. पैसे पाहून असे वाटते की ते बऱ्याच काळापासून कालव्यात असतील. काही लोक कालव्यात अंघोळ करत असताना त्यांना नोटा वाहत असल्याचे दिसले. नोटांची संख्या पाहून काही लोक पुढे गेले असता कुरैच पुलाखालून अनेक बंडल पाण्यात फेकल्याचे दिसले.
नोटांची बंडले पुलाखाली फेकल्याची बातमी आगीसारखी पसरली आणि पुलावर मोठ्या संख्येने लोक जमा झाले. ते पाहताच डझनभर लोकांनी कालव्यात उड्या घेतल्या. दोन्ही हातांनी नोटा गोळा करायला सुरुवात केली. कालव्यात खूप घाण आहे, पण लोकांचे त्याचे काहीही वाटले नाही, पैसे गोळा करण्याची चढाओढच लागली होती.
पोलिसांनाही माहिती मिळाली
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या नोटा कुठून आल्या आणि कोणी फेकल्या. हे स्पष्ट झालेले नाही. या नोटा खऱ्या आहेत की बनावट हेदेखील स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी याबद्दल काहीही दुजोरा दिलेला नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.