आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षात मिळेल भेट:चीनच्या धर्तीवर बिहारचा काचेचा पूल जवळपास तयार; सिक्कीमनंतर नालंदामध्ये, 85 फूट असेल लांबी

नालंदा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील राजगीर येथे देशातील दुसरा आणि बिहारमधील पहिला काचेचा पूल तयार झाला आहे. १९ काेटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा पूल नव्या वर्षात सामान्यांसाठी खुला हाेईल. येथे वन विभागाकडून प्राणिसंग्रहालय, सफारी पार्कही बनवण्यात येत आहे. डीएफआे डाॅ. नेशामणी यांच्या मते, बैभारगिरी पर्वताच्या दाेन शिखरांच्या मध्ये हा बनत आहे. सफारीचे ८० % काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर ग्लास स्काय वाॅक पर्यटकांसाठी उघडण्यात येईल. देशातील पहिला स्काय पूल सिक्कीममध्ये हाेत असून ताे मार्च २०२१ मध्ये तयार हाेईल. जगातील पहिला काचेचा पूल चीनच्या हाँगझाेऊ भागात आहे.

ग्लास स्काय ब्रिजवर एक नजर
बैभारगिरी पर्वताच्या दाेन शिखरांच्या मधाेमध निर्मिती
400 मी. आहे दाेन्ही पर्वतांवरील उंची
200 फूट जमिनीपासून उंचावर निर्मिती
85 फूट लांबी, 5 फूट रुंद आहे
19 काेटी रु. खर्चून बांधला आहे राजगीरमध्ये पूल

बातम्या आणखी आहेत...