आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bijapur Encounter Latest Update | 24 Jawans Died, Jawans Who Died In Encounter Recovered, HM Amit Shah, PM Modi, CRPF, Naxal Encounter; News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सक्लूसिव्ह:वरिष्ठ अधिकाऱ्यांना 20 दिवसांपूर्वीच हाेती नक्षलवादी उपस्थिती असल्याची माहिती; तरीही इतका मोठा हल्ला झाला

रायपुर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑपरेशनल प्लॉनिंगवर प्रश्न उपस्थित होण्याचे तीन कारणे

छत्तीसगडमधील विजापूरमध्ये सुरक्षा दल आण‍ि नक्षवाद्यांममध्ये झालेल्या चकमकीत 24 सैनिक शहीद झाले. सुमारे 700 सैनिकांना घेरुन नक्सलवाद्यांनी सलग तीन तास त्यांच्या गोळीबार केला. 24 तास उलटल्यानंतरदेखील सैनिकांच्या मृतदेह घेण्यासाठी रेस्क्यू टीम पोहचली नाही. यावरुन ऑपरेशनल सर्चिंग किती अपयशी ठरलं हे दिसत आहे. विशेष म्हणजे हे तेव्हा झाले जेव्हा या परिसरात मोठ्या प्रमाणावर नक्सलवादी असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना 20 दिवसांपूर्वीच मिळाली होती. तसेच सुरक्षा दलाचे मोठ-मोठे अधिकारी गेल्या वीस दिवसांपासून या परिसरात गस्त घालत आहे.

विजापूरमधील ज्या भागात ही घटना घडली तो नक्सलवाद्यांचा फर्स्ट बटालियनचा परिसर आहे. 20 दिवसांपूर्वी युएव्ही छायाचित्रांव्दारे या परिसरात मोठ्या प्रमाणावर नक्सलवादी असल्याचे समोर आले होते.

ऑपरेशनल प्लॉनिंगवर प्रश्न उपस्थित होण्याचे तीन कारणे
ह्या घटनेच्या आधी सीआरपीएफचे एडीडीपी ऑपरेशन्स जुल्फिकार हंसमुख, केंद्राचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार आणि सीआरपीएफचे माजी डीजीपी के विजय कुमार आण‍ि विद्यमान आईजी ऑपरेशन्स नलिन प्रभात हे तीन्ही वरिष्ठ अधिकारी गेल्या वीस दिवसांपासून या परिसरात उपस्थित आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या उपस्थितीत एवढ्या संख्येने सैनिक जर शहीद होत असेल तर हे त्यांच्या ऑपरेशन प्लॉनिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे.

1. संबंधित परिसरात वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि हालचाल जास्त काळ लपून राहू शकत नाही. नक्सलवाद्यांना त्यांची माहिती मिळणे पूर्णपणे शक्य आहे.

2. ऑपरेशनमधे सीआरपीएफ कोब्रा, छत्तीसगड एसटीएफ, डीआरजी आणि नवीन बस्तरिया बटालियन आदी बेस्ट फोर्सेसचा समावेश होता. यामुळे हा हल्ला स्थानिक नसून वरच्या स्तरावरील नियोजनात त्रुटी दर्शवणारा आहे.

3. अशा ऑपरेशनमध्ये पाच वेगवेगळ्या सैन्य दलांच्या उपस्थितीत कमांड आणि कंट्रोल करणे हे एक मोठे आव्हान आहे. गोळीबार झाल्यास, सर्वजण त्यांच्या प्रशिक्षण आणि डिझाइननुसार कारवाई करतात. त्यामुळे एकसारखेपणा अस्तित्वात राहत नाही.

बातम्या आणखी आहेत...