आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bikaner Guwahati Express | Marathi News |Guwahati Express Derailed At Jalpaiguri In Bengal; Three Were Killed And At Least 20 Were Injured

मोठी बातमी:बंगालच्या जलपाईगुडी येथे बिकानेर-गुवाहाटी एक्सप्रेस रुळावरुन घसरली; पाच जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगालच्या जलपाईगुड़ी येथे आज संध्याकाळी पाच वाजेदरम्यान एक मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. बिकानेर-गुवाहाटी एक्सप्रेसचे 12 डब्बे रुळावरुन घसरले आहेत. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेक प्रवाशी रेल्वेच्या डब्ब्यात अडकल्याची माहिती मिळत आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्याचे काम सुरू आहे. मात्र अंधार पडल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.

रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक ८१३४०५४९९९ जारी केला आहे.
रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक ८१३४०५४९९९ जारी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवर संवाद साधून, घटनेचा आढावा घेतला. बिकानेर एक्सप्रेस ही मंगळवारी रात्री बिकानेरहून रवाना झाली होती. तर गुरुवारी सकाऴी 5.44 वाजता रेल्वे पटनाहून गुवाहाटीकडे रवाना झाली होती.

बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले.
बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले.

या अपघातात सुमारे 20 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरएफची टीम रवाना झाली असून, बचावकार्य सुरू आहे. या बिकानेर एक्सप्रेसने सुमारे 700 प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे.

रेल्वे अपघातानंतर 50 हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या.
रेल्वे अपघातानंतर 50 हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या.
एका प्रवाशाने सांगितले की, अचानक धक्का बसला आणि ट्रेन रुळावरून घसरली
एका प्रवाशाने सांगितले की, अचानक धक्का बसला आणि ट्रेन रुळावरून घसरली
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष दिल्लीहून बंगालला रवाना. या अपघाताची चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्त करणार आहेत.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष दिल्लीहून बंगालला रवाना. या अपघाताची चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्त करणार आहेत.
अपघातानंतर रेल्वेचे डबे एकावर एक चढले.
अपघातानंतर रेल्वेचे डबे एकावर एक चढले.
अजूनही अनेक प्रवासी रेल्वेच्या डब्यांमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
अजूनही अनेक प्रवासी रेल्वेच्या डब्यांमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...