आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bilawal Bhutto India Visit Update; Pakistans Foreign Minister | Jammu Kashmir | PM Modi

SCO बैठक:पाक परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो गोव्यात दाखल; 2014 मध्ये म्हणाले होते - काश्मीरची 1 इंच जमीन सोडणार नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाक परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी गोव्यात पोहोचलेत. ते शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आेत. भारत पोहोचल्यानंतर ते म्हणाले - 'मी गोव्यात येऊन खूप आनंदी आहे. SCO बैठक यशस्वी ठरेल असा विश्वास आहे.'

तत्पूर्वी, एका व्हिडिओद्वारे ते म्हणाले होते - या बैठकीत सहभागी होण्याच्या माझ्या निर्णयावरून पाकसाठी SCO किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होते. मी सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी उत्सुक आहे.

बिलावल 12 वर्षांनंतर भारतात येणारे पाकचे पहिले परराष्ट्र मंत्री आहेत. यापूर्वी 2011 मध्ये पाकचे माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार भारत दौऱ्यावर आल्या होत्या.

हे छायाचित्र SCO परिषदेसाठी गोव्यात पोहोचलेल्या बिलावल भुट्टोंचे आहे.
हे छायाचित्र SCO परिषदेसाठी गोव्यात पोहोचलेल्या बिलावल भुट्टोंचे आहे.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरेव्ह गोव्यात पोहोचले
त्याचवेळी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह हे 4-5 मे रोजी होणाऱ्या SCO बैठकीत सहभागी होण्यासाठी गोव्यात पोहोचले आहेत. येथे ते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी याबाबत माहिती दिली. रशिया आणि चीनचे परराष्ट्र मंत्री यापूर्वी मार्चमध्ये जी-20 च्या बैठकीसाठी भारतात आले होते.

रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरेव्ह यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. यापूर्वी मार्चमध्ये ते G-20 परिषदेसाठी भारत दौऱ्यावर आले होते.
रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरेव्ह यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. यापूर्वी मार्चमध्ये ते G-20 परिषदेसाठी भारत दौऱ्यावर आले होते.
हे छायाचित्र चिनी परराष्ट्र मंत्री किन गँग यांचे आहे. ते SCO परिषदेसाठी गोव्यात पोहोचलेत.
हे छायाचित्र चिनी परराष्ट्र मंत्री किन गँग यांचे आहे. ते SCO परिषदेसाठी गोव्यात पोहोचलेत.

​​​​जयशंकर यांनी SCO सरचिटणीसांची भेट घेतली

गुरुवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एससीओचे सरचिटणीस झांग मिंग यांची भेट घेतली. ते म्हणाले- भारताच्या अध्यक्षतेखालील SCO चे लक्ष स्टार्टअप्स, पारंपारिक औषध, युवा सक्षमीकरण आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आहे.

पाक मंत्री 7 वर्षांनंतर भारतात
भारत-पाकिस्तानमध्ये 7 वर्षांपासून कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे बिलावल भुट्टो यांच्या दौऱ्याकडे अवघ्या देशाच्या नजरा लागल्या आहेत. बिलावल पाकच्या माजी महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे सुपुत्र आहेत. एप्रिल 2022 मध्ये वयाच्या 33 व्या वर्षी ते पाकचे सर्वात तरुण परराष्ट्र मंत्री बनले. त्यानंतर त्यांनी भारताविषयी 5 वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यावर एक नजर...

1. संबंध सुधारण्यासाठी भारत दौरा नाही - बिलावल
एससीओ बैठकीसाठी भारत दौऱ्यावर येणारे बिलावल म्हणाले होते की, आपला दौरा भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी नाही. पाक एससीओ चार्टरसाठी वचनबद्ध आहे. या भेटीकडे भारतासोबतच्या चर्चेच्या दृष्टीकोनातून पाहू नये. ते SCO पुरते मर्यादित ठेवा.

2. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कसाई म्हटले
15 डिसेंबर रोजी, बिलावल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये म्हणाले - ओसामा बिन लादेन मेला. पण गुजरातचा कसाई अजूनही जिवंत आहे. तो भारताचा पंतप्रधान आहे. भुट्टो यांच्या या विधानावर भारताने तीव्र हरकत घेतली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की, भुट्टो यांना 1971 चा विसर पडला आहे. तेव्हा 90,000 हून अधिक पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यापुढे आत्मसमर्पण केले होते. दुसरीकडे, भारताच्या परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, बिलावल एका अपयशी देशाचे प्रतिनिधी आहेत. ते स्वतःही अपयशी ठरलेत. दहशतवादी मानसिकता असलेल्या लोकांकडून आणखी काय अपेक्षा करू शकता.

3. भारतातील मुस्लिमांशी भेदभाव
बिलावल भुट्टो 18 डिसेंबरला म्हणाले होते - मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचा पक्ष भाजप व आरएसएसला घाबरत नाही. पंतप्रधान मोदींना कसाई म्हटल्याप्रकरमी ते स्पष्टीकरण देताना म्हणाले होते - त्यांचा उद्देश भारतातील मुस्लिमांशी होणाऱ्या भेदभाव व द्वेषाच्या विरोधात आवाज उठवणे हा होता.

4. काश्मीरचा मुद्दा यूएनमध्ये अनेकदा मांडला
2014 मध्ये बिलावल यांनी पहिल्यांदा काश्मीर मुद्द्यावर वक्तव्य केले होते. ते पीपीपी कार्यकर्त्यांना म्हणाले होते - मी संपूर्ण काश्मीर परत घेईन. मी भारताला एक इंच जमिनही सोडणार नाही, कारण, काश्मीर केवळ पाकचा आहे.

तेव्हापासून बिलावल यांनी अनेकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. पण पाकला केव्हाही त्याचा UN अजेंड्यात समावेश करता आला नाही. 11 मार्च रोजी यूएनच्या बैठकीत बिलावल म्हणाले होते - काश्मीरचा मुद्दा यूएनच्या अजेंड्यामध्ये समाविष्ट करणे आमच्यासाठी मोठे काम आहे. भारताची मुत्सद्देगिरी याला कारणीभूत आहे.

5. भारतावर काश्मिरी जनतेवर अत्याचार केल्याचा आरोप
मे 2022 मध्ये, पाकचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील खुल्या चर्चेत जम्मू - काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा व परिसीमन आयोगाच्या आदेशाचा मुद्दा उपस्थित केला. काश्मिरी लोकांवर भारतात अत्याचार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यावेळी झरदारी म्हणाले होते की, भारतासोबत वाटाघाटी करणे खूप कठीण झाले आहे.

2018 मध्ये पहिल्यांदा खासदार
बिलावल भुट्टो 13 ऑगस्ट 2018 रोजी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. 27 एप्रिल 2022 रोजी त्यांनी पाकचे 37 वे परराष्ट्र मंत्री म्हणून शपथ घेतली. 2007 मध्ये बिलावलच्या आई बेनझीर भुट्टो यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तेव्हापासून ते पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष आहेत. तेव्हा बिलावल केवळ 19 वर्षांचा होता.

बिलावल तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. त्यांच्या सुरक्षेवर वार्षिक 10 लाख पौंड (9 कोटी 93 लाख रुपये) खर्च केले जात होते.
बिलावल तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. त्यांच्या सुरक्षेवर वार्षिक 10 लाख पौंड (9 कोटी 93 लाख रुपये) खर्च केले जात होते.

आई पंतप्रधान, वडील राष्ट्रपती
बिलावल भुट्टो यांची आई बेनझीर भुट्टो पाकच्या पंतप्रधान होत्या. तर वडील आसिफ अली झरदारी पाकचे राष्ट्रपती होते. बेनझीर भुट्टो यांनी स्वतःच्या आत्मचरित्रात स्वत:चा राजस्थानच्या भाटी राजपूतांचे वंशज म्हणून उल्लेख केला आहे. 2020 मध्ये, जैसलमेरच्या संस्थानचे माजी महाराज बृजराज सिंह यांच्या निधनावर भुट्टो कुटुंबाने शोकसंदेश पाठवण्यात आला. असे मानले जाते की, राजस्थानचे भाटी, भट्टी राजपूत पाकिस्तानात गेले. तिथे त्यांना भुट्टो म्हटले जाऊ लागले.

बिलावल यांचा जन्म त्यांच्या आई बेनझीर पंतप्रधान होण्याच्या एक महिना अगोदर झाला होता. त्यामुळे बेनझीर त्यांना स्वतःसाठी भाग्यवान मानत.
बिलावल यांचा जन्म त्यांच्या आई बेनझीर पंतप्रधान होण्याच्या एक महिना अगोदर झाला होता. त्यामुळे बेनझीर त्यांना स्वतःसाठी भाग्यवान मानत.

बिलावल भुट्टोस शाहबाज-इम्रान यांच्यापेक्षा श्रीमंत
बिलावल भुट्टो झरदारी यांच्याकडे 150 कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती आहे. त्याची परदेशात जास्त मालमत्ता आहेत. बिलावलच्या दुबईमध्ये 25 मालमत्ता आहेत.

शाहबाज शरीफ यांच्याकडे 10 कोटींची संपत्ती असून, 15 कोटी रुपयांचे कर्ज आहे. शेखूपुरा व लाहोरमध्ये त्यांची 61 एकर जमीन आहे. त्याचे लंडनमध्येही घर आहे, त्याची किंमत 13.5 कोटी रुपये आहे. शाहबाज यांच्या बँक खात्यात 2 कोटी रुपये आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नी नुसरतकडे जवळपास 23 कोटींची संपत्ती आहे. नुसरतच्या बँक खात्यात अनेक गुंतवणुकीसह 2 कोटी रुपये आहेत.

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे 2 लाख रुपये किमतीच्या 4 बकरे आहेत. बनीगालामध्ये 30 एकरचा बंगलाही आहे. लाहोरच्या जमान पार्कमध्ये त्यांना घर आणि 600 एकर जमीन वारसाहक्काने मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे बुलेटप्रूफ कार चालवणाऱ्या इम्रान यांची एकही कार रेकॉर्डवर नाही किंवा त्याची पाकबाहेर कोणतीही मालमत्ता नाही. इम्रान यांच्या बँक खात्यात जवळपास 6 कोटी रुपये आहेत. इम्रान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबीची एकूण संपत्ती 15 कोटी रुपये आहे.