आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bill Gates Pm Narendra Modi Meeting Update; India Health & Development | Pm Modi

बिल गेट्स PM मोदींना भेटले:म्हणाले- आरोग्य आणि विकास क्षेत्रातील भारताच्या वाढीबद्दल मी पूर्वीपेक्षा जास्त सकारात्मक

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन उद्योगपती बिल गेट्स यांनी शुक्रवारी भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. - Divya Marathi
अमेरिकन उद्योगपती बिल गेट्स यांनी शुक्रवारी भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

अमेरिकन उद्योगपती बिल गेट्स यांनी शुक्रवारी भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी आरोग्य, हवामान बदल, G20 अध्यक्षपदासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. बिल गेट्स यांनी त्यांच्या अधिकृत ब्लॉग 'गेट्स नोट्स'मध्ये या बैठकीबद्दल लिहिले आणि भारताचे कौतुक केले.

इनोव्हेशनमध्ये इन्व्हेस्ट केल्यावर काय शक्य होते, हे भारत जगाला दाखवत असल्याचे त्यांनी लिहिले. आरोग्य, विकास आणि हवामान बदल या क्षेत्रांमध्ये भारताच्या ग्रोथबद्दल मी नेहमीपेक्षा अधिक सकारात्मक आहे. मला आशा आहे की भारताने ही ग्रोथ सुरूच ठेवेल आणि जगासोबत आपले इनोव्हेशन शेअर करत राहील.

बिल गेट्स यांनी त्यांच्या अधिकृत ब्लॉग 'गेट्स नोट्स'मध्ये या बैठकीबद्दल लिहिले आणि भारताचे कौतुक केले.
बिल गेट्स यांनी त्यांच्या अधिकृत ब्लॉग 'गेट्स नोट्स'मध्ये या बैठकीबद्दल लिहिले आणि भारताचे कौतुक केले.

गेट्स यांनी भारतीय कोरोना लस आणि आरोग्य सेवा प्रणालीचे कौतुक केले

बिल गेट्स म्हणाले की, प्रभावी, सुरक्षित आणि परवडणारी कोरोना लस बनवण्याची भारताची अद्भुत क्षमता प्रशंसनीय आहे. या लसींनी लाखो लोकांचे प्राण वाचवले आणि इतर आजारांना जगभरात पसरण्यापासून रोखले. ही आनंदाची बाब आहे की गेट्स फाऊंडेशनदेखील काही लसी बनवण्यासाठी भारताला सहकार्य करू शकले.

त्यांनी लिहिले की, 'भारताने केवळ जीवनरक्षक लसीच बनवल्या नाहीत, तर त्या पोहोचवण्यातही मोठे काम केले. भारताच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने Co-WIN नावाच्या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मद्वारे कोरोना लसीचे 220 कोटी डोस वितरीत केले. या प्लॅटफॉर्मद्वारे कोट्यवधी लोकांनी लसीकरण करण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली आणि लसीकरण केल्यानंतर त्यांना डिजिटल प्रमाणपत्रही मिळाले. CO-WIN हे जगासाठी एक उदाहरण असल्याचे पंतप्रधान मोदींचे मत आहे आणि मी त्यांच्याशी सहमत आहे.

बिल गेट्स यांनी लिहिले की, भारताने केवळ जीवनरक्षक लसीच बनवल्या नाहीत, तर त्या पोहोचवण्यातही मोठे काम केले.
बिल गेट्स यांनी लिहिले की, भारताने केवळ जीवनरक्षक लसीच बनवल्या नाहीत, तर त्या पोहोचवण्यातही मोठे काम केले.

डिजिटल पेमेंटद्वारे 30 कोटी लोकांना इमर्जन्सी पेमेंट मिळाले

गेट्स यांनी लिहिले की, महामारीच्या काळात भारताने डिजिटल पेमेंटचा अवलंब केला. 30 कोटी लोकांना आपत्कालीन डिजिटल पेमेंट मिळाले. यामध्ये 20 कोटी महिलांचा समावेश आहे. हे शक्य झाले, कारण भारताने आर्थिक समावेशाला आपले प्राधान्य दिले आणि डिजिटल आयडी प्रणाली (आधार) आणि डिजिटल बँकिंगसारख्या नावीन्यपूर्ण प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली. यावरून हे सिद्ध होते की, आर्थिक समावेशन ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे.

गेट्सने लिहिले की, महामारीच्या काळात भारताने डिजिटल पेमेंटचा अवलंब केला. 30 कोटी लोकांना आपत्कालीन डिजिटल पेमेंट मिळाले.
गेट्सने लिहिले की, महामारीच्या काळात भारताने डिजिटल पेमेंटचा अवलंब केला. 30 कोटी लोकांना आपत्कालीन डिजिटल पेमेंट मिळाले.

डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने सरकार अधिक चांगले काम करते

बिल गेट्स यांनी लिहिले की, गतिशक्ती कार्यक्रम हे डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने सरकार कसे चांगले काम करू शकते याचे उत्तम उदाहरण आहे. हा कार्यक्रम रेल्वे आणि रस्त्यासह 16 मंत्रालयांना डिजिटली जोडतो, जेणेकरून ही मंत्रालये एकाच वेळी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी त्यांच्या योजना पूर्ण करू शकतील आणि भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंते यांचे काम वेगाने पुढे जाऊ शकेल.

भारताचे इनोव्हेशन जगाची मदत करत आहेत

गेट्स यांनी लिहिले की, भारताचे G20 अध्यक्षपद ही देशातील नवकल्पना जगाला कशी मदत करू शकतात हे अधोरेखित करण्याची एक उत्तम संधी आहे. भारताच्या सर्व प्रयत्नांमध्ये त्यांना मदत करणे, विशेषत: भारताचे डिजिटल आयडी आणि पेमेंट प्रणाली इतर देशांमध्ये नेणे, हे गेट्स फाउंडेशनच्या प्राधान्यांपैकी एक आहे.

बातम्या आणखी आहेत...