आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी भारतात रिक्षा चालवला आहे. एवढा मोठा उद्योजक सूटाबूटात रिक्षा चालवतो हे पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांचा रिक्षा चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
बिल गेट्स यांनी महिंद्रा अँड महिंद्राची इलेक्ट्रिक ऑटो-रिक्षा महिंद्रा ट्रेओ चालवली आहे. याचा व्हिडिओ महिंद्रा आणि महिंद्रा या लोकप्रिय वाहन निर्मात्या कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.
आनंद महिंद्रा हे सतत या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर काही ना काही तरी शेअर करत असतात. आनंद महिंद्रा यांनी बिल गेट्सचा इलेक्ट्रिक ऑटो चालवतानाचा व्हिडिओ शेअर केला. बिल गेट्स स्वतः ही इलेक्ट्रिक ऑटो चालवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि 1958 मध्ये प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट 'चलती का नाम गाडी' "बाबू समझो इशारे होरन पुकारे पम पम पम" चा टायटल ट्रॅक वाजत आहे. तसेच या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये महिंद्रा यांनी म्हटले की, 'चलती का नाम बिल गेट्स की गाडी'. तुम्हाला इलेक्ट्रिक ऑटो-रिक्षा महिंद्रा ट्रेओ चालवताना पाहून आनंद झाला. आता तुमच्या पुढ्या ट्रिपचा अजेंडा हा बिल गेट्स, सचिन तेंडुलकर आणि माझ्यामध्ये 3-wheeler EV drag race व्हावी.
बिल गेट्स यांनीही आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर हा रील व्हिडिओ शेअर केला. बिल गेट्स यांनी आनंद महिंद्रा यांच्या कंपनी महिंद्रा ऑटोचे कौतुक केले आहे, ते म्हणाले की मला पाहून आनंद झाला आणि मी प्रभावित झालो की महिंद्रासारखी कंपनी परिवहन उद्योगाच्या डीकार्बोनायझेशनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. आनंद महिंद्रा आणि बिल गेट्स हार्वर्ड विद्यापीठात वर्गमित्र होते आणि आज दोघेही आपापल्या क्षेत्रात अव्वल आहेत.
बिल गेट्स यांनी लाटल्या पोळ्या, VIDEO
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ते पोळ्या लाटताना व त्यावर तूप लावून खाताना दिसून येत आहेत. त्यांच्यासोबत अमेरिकन शेफ एटन बर्नथही आहेत.
शेफ एटन बर्नथ यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते बिल गेट्स यांना पोळ्या बनवण्याचे प्रशिक्षण देत आहेत. तसेच आपण या पोळ्या कुठे व कसे शिकलो हे ही त्यांना सांगत आहेत. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.