आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bill Today In Rajasthan | Action Will Be Taken Against Hospitals If They Ask For Money Before Treatment

राजस्थानात आज विधेयक:उपचारापूर्वी पैसे मागितल्यास रुग्णालयांवर होणार कारवाई

जयपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थान विधानसभेत शुक्रवारी देशातील पहिले ‘आरोग्य हक्क’ हे वैद्यकीय उपचारासंबंधीचे विधेयक मांडण्यात येणार आहे. काँग्रेसने २०१८ च्या िवधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात हे आश्वासन दिले होते.

हे विधेयक पारित झाल्यास खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णाला दाखल करण्यापूर्वी पैसे जमा करण्यास सांगता येणार नाही. अडवणूक केल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल. आरोग्य सेवेविषयी तक्रार असल्यास त्याचे निराकरण २४ तासांच्या आत करावे लागेल. अन्यथा ही तक्रार आपोआपच जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्याकडे जाईल. त्यानंतर एका महिन्याच्या आत जिल्हा आणि त्यानंतर एका महिन्याच्या आत राज्य आरोग्य विभागाला या प्रकरणात कारवाई करावीच लागेल.

बातम्या आणखी आहेत...