आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Billions Of Assets Of Naxals Involved In Killing Of 76 CRPF Commandants To Be Seized

दिव्य मराठी विशेष:सीआरपीएफच्या कमांडंटसह 76 जवानांच्या हत्येमध्येसामील नक्षलींची कोट्यवधींची संपत्ती जप्त होणार

गौतमकुमार गुप्ता | जमुई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नक्षलवाद रोखण्यासाठी केंद्रासोबत बिहार सरकारची संयुक्त आर्थिक नाकेबंदी
  • तीन नक्षलींनी बिहार, बंगाल, झारखंड, यूपीत जमवली संपत्ती

नक्षलवादावर नियंत्रणासाठी केंद्र सरकार आता बिहार सरकारसोबत मिळून नक्षलींच्या आर्थिक नाड्या आवळणार आहे. त्यासाठी संयुक्त मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून जमुई पोलिसांनी बिहार-झारखंड विशेष समितीनेे नक्षली संघटनेच्या तीन नक्षलींची बेकायदा संपत्तीचा तपशील ईडीला सोपवला आहे. त्यांनी नातेवाइकांच्या नावाने बिहार, झारखंड, बंगाल, उत्तर प्रदेश व पंजाबमध्ये संपत्ती तयार केली आहे. त्यास जप्त केले जाणार आहे. नक्षलींनी बिहार-झारखंडशिवाय छत्तीसगडमध्ये देखील दहशत पसरवली आहे. ६ एप्रिल २०१० रोजी छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सीआरपीएफच्या ६२ व्या बटालियनच्या तुकडीवर हल्ला करण्याच्या कटात दोन आरोपींचा समावेश होता. अविनाश व सोरेन ही नक्षलींची नावे आहेत. या हल्ल्यात कमांडंट मनीष कुमारसह ७६ जवान शहीद झाले होते. त्याशिवाय २४ एप्रिल २०१७ रोजी सुकमामध्ये देखील सीआरपीएफवरील हल्ल्यामागेही या नक्षलींचा हात होता.

अरविंदचा पंजाबसह पाच राज्यांत कारभार

ईडीकडे पाठवलेल्या अहवालात सोनो भागाचा रहिवासी अरविंद ऊर्फ अविनाशकडे अडीच कोटींहून जास्त संपत्तीचा उल्लेख आहे.

पिंटूही कोट्यधीश, मध्य प्रदेशसह ४ राज्यांत संपत्ती

भाकपा माओवादी संघटनेचा नक्षली पिंटू राणा संघटनेत श्रीमंत. त्याच्या नावे पंजाब, मध्य प्रदेश, बिहारच्या १ कोटीची संपत्ती आहे.

अनुज सोरेनची संपत्ती आधीही अनेकवेळा केली जप्त

झारखंडच्या अनुज सोरेनकडे हजारीबागजवळ घर आहे. अनेक जिल्ह्यांत संपत्ती आहे. या आधीही पोलिसांनी अशी संपत्ती जप्त केली.

ईडीला सोपवली संपत्तीची यादी

सोरेन, अविनाश व राणा यांची संपत्ती नातेवाइकांच्याही नावे आहे. ईडीला पाठवण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ही एकूण संपत्ती पाच ते सहा राज्यांत आहे. लवकरच ईडी कारवाई करेल. -सुधांशुकुमार, एएसपी अभियान, जमुई

बातम्या आणखी आहेत...