आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Billions Of People In India Are Back In The Abyss Of Poverty Due To Corona Outbrek

कोरोनामुळे देशावर मंदीचे सावट:भारतात कोट्यवधी लोक पुन्हा दारिद्र्याच्या गर्तेत

अनिर्बान नाग आणि स्वान्सी अफोन्सोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील बचत व उत्पन्नातील घसरणीचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील अनेक राज्यांत निर्बंधांमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका गरिबांना बसत आहे. २०२० मधील घटनांची पुनरावृत्ती होत आहे. स्थलांतरित मजूर गेल्या लॉकडाऊनच्या तडाख्यातून सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच आणखी एका लाॅकडाऊनने त्यांचे कंबरडे मोडले आहे. मागास राज्यांतून दिल्ली व मुंबईसारख्या महानगरांत कामासाठी आलेले बहुतांश मजूर रोजंदारीवर काम करतात.

अहमदाबाद विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक जीमोल उन्नी यांच्या गणनेनुसार, या तथाकथित असंघटित अर्थव्यवस्थेत ४० कोटींपेक्षा जास्त लोक काम करतात. त्यात सर्वात मोठी संख्या शेतकामगारांची आहे. यानंतर बांधकाम क्षेत्रात सुमारे ५-६ कोटी मजूर लोक राबतात.भारतातील असंघटित क्षेत्र हे २.९ लाख कोटी डॉलर्सच्या देशांतर्गत मागणीआधारित अर्थव्यवस्थेचा जवळपास निम्मा हिस्सा आहे. असंघटित मजुरांना युनियन आणि नेतेमंडळींचे संरक्षण मिळत नाही. यामुळे सरकारी मदतीपासूनही त्यांना वंचितच राहावे लागते. पोटाची खळगी भरल्यानंतर औषधोपचारांवर खर्च करण्याइतपही त्यांच्याकडे पैसा उरत नाही. कोरोना महामारीने त्यांची स्थिती आणखीच बिकट करून टाकली आहे.

सरकारी अंदाजानुसार, गेल्या वित्तवर्षात भारताचा जीडीपी वृद्धिदर उणे ८% नाेंद झाला. १९५२ नंतर ही सर्वात मोठी घसरण आहे. या वित्तवर्षातही दोन अंकी वृद्धिदर गाठणे कठीण दिसत आहे. एसअँडपी ग्लोबलचे मुख्य अर्थतज्ज्ञ शॉन रोशेंनी भारताच्या जीडीपी वृद्धिदराचा आधीचा ११% चा अंदाज घटवून ९.८% केला आहे.

बातम्या आणखी आहेत...