आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बानो सामूहिक अत्याचार प्रकरण:बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणी 11 दोषींची शिक्षा माफ करून त्यांची तुरुंगातून सुटका

अहमदाबाद / नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२००२ मधील गुजरात दंगलीत बिल्कीस बानो सामूहिक अत्याचार आणि तिच्या कुटुंबातील ७ सदस्यांच्या हत्येतील सर्व ११ दोषींची शिक्षा माफ करून त्यांची तुरुंगातून सुटका केली आहे. राजकीय कटाद्वारे आम्हाला गुन्हेगार बनवल्याचा आरोप दोषींनी केला आहे. तर पीडित बिल्कीसच्या कुटुंबीयांनी दोषींच्या सुटकेवर आश्चर्य व्यक्त केले आहे. काँग्रेससह विरोधी पक्ष आणि महिला हक्क कार्यकर्त्यांनी गुजरात सरकारच्या निर्णयावर टिका केली आहे.

गुजरात सरकारच्या माफीच्या धोरणांतर्गत १५ ऑगस्ट रोजी जसवंत नाई, गोविंद नाई, शैलेश भट्ट, राधेश्याम शाह, विपिन जोशी, केशरभाई वोहानिया, प्रदीप मोढडिया, बाकाभाई वोहानिया, राजूभाई सोनी, मितेश भट्ट आणि रमेश चांदना यांची सुटका करण्यात आली. मुंबईतील सीबीआय कोर्टाने २००८ मध्ये यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली होती. सर्व दोषींनी १५ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा भोगली आहे. नियमांनुसार, जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या कैद्यांना १४ वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर सरकार शिक्षा माफ करू शकते. २००२ मध्ये गरोदर बिल्कीसवर ११ जणांनी सामूहिक अत्याचार केला होता.

आजही बेघर : पतीची व्यथा
मी पत्नी व मुलांसोबत आजही बेघर असल्याचे िबल्कीसचे पती याकूब रसूल यांनी सांगितले. गुजरात सरकारने कुटुंबाला ५० लाख रुपयांची भरपाई दिली. मात्र, नोकरी वा घर देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नाही.

बातम्या आणखी आहेत...