आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या लष्कराचे सर्वोच्च अधिकारी आणि पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनंतात विलीन झाले. जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांना एकाच चितेवर मुखाग्नि देण्यात आला. दोघे विवाहापासून चितेपर्यंत सोबतच राहिले. दिल्लीच्या आर्मी कँटोनमेंटमध्ये शुक्रवारी जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीचा अंत्यविधी झाला. यावेळी दोन्ही मुली कृतिका आणि तारिणी यांनी एकाचवेळी एकाच चितेवर त्यांना मुखाग्नी दिला.
प्रोटोकॉलनुसार, जनरल रावत यांना 17 तोफांची सलामी देण्यात आली. यादरम्यान 800 लष्करी जवान उपस्थित होते. जनरल रावत यांची युनिट ५/११ गोरखा रायफल्स त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सर्व व्यवस्था हाताळली. यावेळी तीनही दलांचे प्रमुख उपस्थित होते.
शाह आणि डोभाल श्रद्धांजली वाहण्यासाठी घरी पोहोचले
जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य जनरल रावत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.