आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलिकॉप्टर दुर्घटनेचे सत्य:प्रत्यक्षदर्शी म्हणाले- क्रॅश झाल्यानंतर हेलिकॉप्टर झाडांवर आदळले नंतर आग लागली, जळत्या अवस्थेत बाहेर पडत होते प्रवासी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी लष्कराचे MI-17 हेलिकॉप्टर कोसळले. त्यात 14 जण होते. त्यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांचा समावेश होता. ज्या भागात हा अपघात झाला तेथे धुके पसरले होते. या अपघाताचे सर्वात मोठे कारण हवामान असल्याचे मानले जात आहे.

या प्रकरणात काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही पुढे आले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हेलिकॉप्टर वेगाने झाडांवर आदळले. त्यानंतर आग लागली. दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीचं म्हणणे आहे की, त्यांनी जळणाऱ्या लोकांना बाहेर पडताना पाहिले.

स्थानिक लोक सर्वात आधी पोहोचले
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी कृष्णस्वामी म्हणाले - मी माझ्या घरी होतो. तेवढ्यात मोठा आवाज ऐकू आला. बाहेर येऊन पाहिले तर एक हेलिकॉप्टर कोसळले. एकामागून एक दोन झाडांना धडकली. त्यानंतर आग लागली. हेलिकॉप्टरमधून दोन-तीन लोक बाहेर पडतानाही मी पाहिले, त्यांच्या शरीराला आग लागली होती. मी त्या भागात राहणाऱ्या लोकांना फोन करून मदत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांना माहिती देण्यात आली.

घटनास्थळी बुधवारी दुपारी अशीच स्थिती होती.
घटनास्थळी बुधवारी दुपारी अशीच स्थिती होती.

घटनास्थळापासून कृष्णा यांचे घर 100 मीटर अंतरावर
घटनास्थळी सर्वप्रथम पोहोचलेल्या कृष्णस्वामी यांच्या म्हणण्यानुसार, हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणापासून त्यांचे घर फक्त 100 मीटर अंतरावर आहे. ही घटना दुपारी 12.20 च्या सुमारास घडली. कृष्ण म्हणाले- आवाज ऐकताच मी त्या दिशेने धावलो. प्रथमदर्शनी तेथे फक्त आग आणि धूरच दिसत होता. ज्वाला घराच्या उंचीपेक्षा जास्त होत्या.

या परिसरात राहणाऱ्या कुमार नावाच्या मुलाने पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यासाठी धाव घेतली. झाडांच्या मधोमध पडलेल्या हेलिकॉप्टरमधून दोन-तीन लोक बाहेर पडतानाही दिसले. सगळ्यांच्या आग लागली होती.

बातम्या आणखी आहेत...