आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bipin Rawat Helicopter Crash | Marathi News |Checking The Phone Of The Person Who Took The Video Of The Helicopter

जनरल रावत मृत्यू प्रकरण:हेलिकॉप्टरचा व्हिडिओ घेणाऱ्याच्या फोनची तपासणी; घटनास्थळ प्रतिबंधित क्षेत्र, मग प्रत्यक्षदर्शी तेथे काय करत होते?

कुन्नूर (तामिळनाडू)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चीफ ऑप डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनाप्रकरणी कुन्नूर पोलिसांनी एका प्रत्यक्षदर्शीचा मोबाइल फोन जप्त करून तो न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे (फॉरेन्सिक) तपासणीसाठी पाठवला आहे. पोलिसांनी रविवारी सांगितले की, ज्या वेळी जनरल रावत यांचे हेलिकॉप्टर निलगिरी जिल्ह्यातील कट्टेरी क्षेत्रात अचानक बदललेल्या हवामानामुळे धुक्यात अडकले होते, त्या वेळचा एक व्हिडिओ घटनेनंतर सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. तो कोइंबतूर येथील छायाचित्रकार जो यांनी आपल्या मोबाइल फोनवर चित्रित केला होता. जो आपले मित्र नजर आणि काही कुटुंबीयांसमवेत ८ डिसेंबर रोजी घटनास्थळाजवळ हजर होते. जो यांनी पोलिसांना सांगितले की त्यांना हेलिकॉप्टर खूप जवळ आल्याचा मोठा आवाज आला. तेव्हा त्यांनी धुक्यात अडकलेल्या हेलिकॉप्टरचा व्हिडिओ चित्रित केला होता. पोलिसांना शंका आहे की, ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळले, तेथे घनदाट जंगल आहे. हिंस्र जनावरे तेथे राहतात.

हे ठिकाणही सामान्य लोकांसाठी प्रतिबंधित आहे. मग जो आणि नजर इतक्या लोकांसोबत या प्रतिबंधित ठिकाणावर काय करत होते. त्यामुळे याबाबतही चौकशी केली जात आहे. सध्या पोलिसांनी जो यांचा फोन कोइंबतूरच्या फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवला आहे. जनरल रावत यांच्या मृत्यूच्या तपासात पोलिस प्रत्येक कडी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक प्रत्यक्षदर्शीची चौकशी केली जात आहे.

आणखी तीन शहिदांवर अंत्यसंस्कार : हेलीकॉप्टर अपघातात शहीद झालेले ले. कर्नल हरजिंदरसिंग यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुली प्रीत कौरने अंत्यसंस्कार पूर्ण केले. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तिन्ही सेनांचे प्रमुख उपस्थित होते. लांसनायक बी. साईतेजा यांच्यावर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील त्यांचे गाव येगुवारेगदी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नायक गुरसेवकसिंग यांच्यावर तरनतारनमधील गाव डोड सोधियनमध्ये त्यांचा ४ वर्षांचा मुलगा गुरफतेह याने अंत्यसंस्कार केले. गुरसेवक यांनी दीड महिन्यांपूर्वी दिलेला गणवेश परिधान करूनच गुरफतेहने वडिलांवर अंत्यसंस्कार केले. गुरसेवक यांच्या पत्नीने मुलालाही सैन्यदलात पाठवण्याची इच्छा व्यक्त केली. तर सैन्य हवालदार सतपाल राय यांचे पार्थिव दार्जिलिंगजवळील त्यांचे गाव तकदाह येथे पोहोचले आहे.

बातम्या आणखी आहेत...