आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामल्ल्याळी चित्रपट दिग्दर्शक अली अकबर यांनी इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. अली अकबर यांनी शनिवारी यासंदर्भात घोषणा केली. देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर एकीकडे समस्त देशवासीय दुखात आहेत. तर दुसरीकडे काही कट्टरपंथी आनंद साजरा करत होते. त्यावरच नाराज होऊन आपण इस्लाम धर्म सोडून सनातन धर्म स्वीकारत आहोत असे दिग्दर्शकाने सांगितले आहे.
म्हणाले- इस्लामवरून माझा विश्वास उडाला
चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अली अकबर यांनी या निमित्ताने एक फेसबूक लाइव्ह केले आहे. यामध्ये त्यांनी सांगितले, की "मी आणि माझी पत्नी हिंदू धर्म स्वीकारत आहोत. धर्मांतरानंतर माझे नाव बदलून 'रामसिंहन' झाले आहे. काही कट्टरपंथियांकडून जनरल रावत यांच्या निधनावर आनंद साजरा केला जात होता. देशातील मुस्लिम नेते आणि धर्मगुरुंनी त्याचा विरोध करत एक शब्दही काढला नाही. देशाच्या शूर वीरचा असा अपमान स्वीकारणार नाही. आता इस्लामवरून माझा विश्वास उडाला आहे."
रामसिम्हन (नवीन नाव) पुढे बोलताना म्हणाले, "मला जन्मापासून जे मिळाले होते ते मी फेकून दिले आहे. आजपासून मी मुस्लिम नाही तर एक भारतीय आहे. माझा संदेश त्या लोकांसाठी आहे ज्यांनी भारताच्या विरोधात हसतानाच्या स्मायली पोस्ट केल्या आहेत." दिग्दर्शकाच्या या पोस्टवरून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
केरळ भाजपचे पदाधिकारी होते अकबर उर्फ रामसिंहन
अली अकबर केरळातील भाजपच्या प्रदेश समितीचे सदस्य होते. दोन महिन्यांपूर्वीच पक्षासोबत झालेल्या मतभेदानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 2014 मध्ये आम आदमी पक्षाच्या तिकीटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर भाजपच्या तिकीटावर कोझीकोडे येथील महापालिका निवडणुकीत उतरले होते. रामसिंहन यापूर्वी 2015 मध्ये खूप चर्चेत आले होते. मदरशात शिक्षण घेत असताना आपल्यावर लैंगिक अत्याचार झाला होता असा दावा त्यांनी केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.