आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामिळनाडूच्या कुन्नुर येथे आठ डिसेंबर रोजी CDS जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. या अपघाताविषयी अधिकची माहिती आता समोर आली आहे. रावत यांचा हेलिकॉप्टर हा पायलटच्या चुकीमुळे क्रॅश झाल्याचे तपासात समोर आले आहे. चॉपरमध्ये कोणत्याही प्रकारे टेक्निकल अडथळा नव्हता, तसेच कोणत्याही प्रकारचे षडयंत्र देखील नसल्याचे समोर आले आहे. तिन्ही दलाच्या वतीने करण्यात आलेल्या संयुक्त तपासातून ही माहिती समोर आली आहे.
इंडियन एयरफोर्सने याबाबत म्हटले आहे की, हवामान खराब असल्याने तसेच हवामानात अचानक बदल झाल्याने पायलटने हेलिकॉप्टर खाली घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यादरम्यान हेलिकॉप्टर चुकून डोंगराळ भागात आदळला.
एयरफोर्सने सांगितले की, फ्लाइट डेटा आणि कॉकपिट वॉयस रिकॉर्डर तपासले असता, त्यात कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा तसेच मशीनांसोबत कोणत्याही प्रकारे छेडछाड करण्यात आलेली नाही. आठ डिसेंबर रोजी भारतीय वायुसेनेचा MI-17 हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कुन्नुर या भागात क्रॅश झाला होता. या अपघातात जनरल बिपिन रावत यांची पत्नी मधुलिका यांच्यासह 12 जणांचा अपघातात मृत्यू झाला होता.
हेलिकॉप्टर वेगाने झाडांवर कोसळले
कुन्नुर येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे की, हेलिकॉप्टर वेगाने झाडात कोसळले होते. त्यानंतर त्यात आग लागली होती. तर आणखी एका प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे की, हेलिकॉप्टर जेव्हा आग लागली तेव्हा त्याने लोकांना जळताना पाहिले. तसेच काहीजण जळून हेलिकॉप्टरच्या खाली देखील पडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. तर प्रत्यक्षदर्शी कृष्णास्वामी सांगितले की, मी माझ्या घरी होतो. तेव्हा मला एक मोठा आवाज ऐकू आले. बाहेर येऊन मी पाहिले असता बाहेर हेलिकॉप्टर क्रॅश झाला होता. आणि हेलिकॉप्टरमध्ये आग लागली होती.
मास्टर ग्रीन कॅटेगिरीचे क्रू उडवत होते हेलिकॉप्टर
सीडीएस बिपिन रावत यांचा ज्या हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले, ते हेलिकॉप्टर मास्टर ग्रीन कॅटेगिरीतील क्रू उडवत होता. हेलिकॉप्टर चालवणारा पायलट चांगल्या प्रकारे एक्सपर्ट असून, तो मास्टर ग्रीन कॅटेगिरीतील चालक होता. मात्र असे असतानाही हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे.
तपासात सूचना
मीडिया रिपोर्ट नुसार, या प्रकरणाशी संबंधित एक तपास अहवाल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे देण्यात आले आहे. त्या अहवालात काही सुचना देखील देण्यात आल्या आहेत. विमान/हेलिकॉप्टर उडवणारा पायलट हा मास्टर ग्रीन श्रेणीचा पायलट असला तरी, हवाई वाहतूक नियंत्रकाला खराब हवामानात किंवा कठीण परिस्थितीत सल्ला देण्याचे अधिकार दिले पाहिजेत. जर हवाई वाहतूक नियंत्रकाला वाटत असेल की पायलटच्या टेक ऑफ किंवा लँडिंगच्या निर्णयावर तो समाधानी नाही, तर तो अंतिम कॉल देखील घेऊ शकतो. अशा सूचना तपासात देण्यात आल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.