आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bipin Rawat | Marathi News | General Bipin Rawat Death | The Cause Of CDS General Bipin Rawat's Helicopter Crash Has Come To Light!

खराब हवामानामुळे झाली दुर्घटना:सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचे कारण आले समोर!

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सीडीएस जनरल बिपिन रावत हेलिकॉप्टर दुर्घटना प्रकरणी ट्राई सर्विस कमेटीचा अहवाल समोर आला आहे. ट्राईने हा अहवाल वायुसेना प्रमुखाला सोपवले आहे. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे त्या अहवालात सांगितले आहे. मिडिया रिपोर्टनुसार, एयर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या कमेटीने हा अहवाल तयार केला आहे.

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. बिपिन रावत यांच्यासह लष्करातील 14 अधिकाऱ्यांना देशाने गमावले आहे. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी कोर्ट ऑफ इंक्वॉयरी गठित करण्यात आली होती. त्यांच्या तपासात आता मोठा खुलासा झाला आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह लष्करातील 14 अधिकारी असलेले हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागचे मोठे कारण समोर आले आहे. हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे क्रॅश झाल्याचे समितीच्या चौकशीतून समोर आले आहे.

हेलिकॉप्टर दुर्घटनेत लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांचा मृत्यू

लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन हवाई दलाचे IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होते. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील मोठ्या पदावरील अधिकारी होते. 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते.

बातम्या आणखी आहेत...