आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात बर्ड फ्लूमुळे 800 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या नमुना तपासणीत संसर्ग झाल्याचे दिसून आले. सोमवारी दिल्लीत बर्ड फ्ल्यूची नोंद झाली. दिल्ली सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या म्हणण्यानुसार 8 कावळे आणि बदकांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
कृषीविषयक संसदीय समितीने आज मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पशुवैद्यकीय सेवांच्या सद्यस्थिती आणि जनावरांच्या लसींच्या उपलब्धतेबद्दल चर्चा होईल.
दिल्लीः 118 पक्षी मारले गेले
रविवारी दिल्ली विकास प्राधिकरणाच्या वेगवेगळ्या उद्यानात 91 कावळे आणि 27 बदकांचा मृत्यू झाला. संजय तलावाच्या सभोवतालचे विभाग सतर्क विभाग म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र: मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली
परभणी जिल्हा प्रशासनाने मुरुंबा गावात 8000 पक्ष्यांना मारण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील 10 किमी परिसरात कोंबडी विक्री आणि विक्रीवरही बंदी घातली आहे. गावातील लोकांची वैद्यकीय तपासणीही केली जाईल. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बर्ड फ्लूचा आढावा घेण्यासाठी आज बैठक बोलावली आहे.
आतापर्यंत या 9 राज्यांमध्ये पोहोचला बर्ड फ्ल्यू
1. केरळ
2. राजस्थान
3. मध्य प्रदेश
4. हिमाचल प्रदेश
5. हरियाणा
6. गुजरात
7. उत्तर प्रदेश
8. महाराष्ट्र
9. दिल्ली
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.