आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Biscuits Price Hike | Biscuits Eaten With Wheat Flour And Tea Are Also Expensive; Wheat Prices Rise By Rs 350 To Rs 400 Per Quintal | Marathi

युद्धाचा परिणाम:गव्हाच्या पीठाबरोबर चहासोबत खात असलेली बिस्किटेही महाग; गव्हाच्या किंमतीत क्विंटलमागे 350 ते 400 रुपयांची वाढ

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका थेट सर्वसामान्यांवर पडताना दिसत आहे. युद्धामुळे खाद्यतेलापाठोपाठ अनेक अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. त्यामूळे सर्वसामान्यांना युद्धाचा नकळत फटका बसत आहे. सर्वसामान्यांचा नाष्टा महाग झाला आहे. त्यापाठोपाठ आता चहासोबत आपण खात असलेली बिस्किटे देखील महाग झाली आहेत. तसेच सर्वसामान्यांचा नाष्टा म्हणून ओळख असलेला वडापाव देखील 5 ते 7 रुपयांनी महागला आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा थेट फटका आता सर्वसामान्यांना बसू लागला आहे. युद्धामुळे गव्हाच्या निर्यातीवर परिणाम झाला असून, त्यामुळे गव्ह्याचे पदार्थ महागले आहेत.

जीभेचे चोचले पुरवताना आता आखडता हात घ्यावा लागणार आहे. कारण महागाईचा भडका दिवसागणित उडत आहे. यात मॅगीही मागे राहिलेली नाही.12 रुपयांना मिळालेली मॅगीत देखील दोन रुपयांनी वाढ झाली असून, मॅगी आता 14 रुपयांना मिळणार आहे. मॅगीच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने मॅगी महाग झाली आहे. त्यानंतर आता गव्हाचे पीठ, बिस्कीटेही महागली आहेत.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर पाहायला मिळत आहे. मॅगीनंतर आता गव्हाचे पीठ आणि बिस्कीटही महागली आहेत. त्यामुळे, गव्हाच्या सर्वच पदार्थांच्या दरात वाढ झाली आहे. युद्धामुळे गव्हाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 29 टक्के गव्हाचा वाटा असून, 19 टक्के मक्याचा वाटा आहे.

युक्रेन-रशिया युद्धामुळे गेल्या 10 दिवसात गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. क्विंटलमागे 350 ते 400 रुपयांची वाढ झाली आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. मात्र आर्थिक निर्बंधांमुळे रशियातून निर्यात बंद झाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार असलेल्या युक्रेनमधूनही निर्यात बंद झाली आहे. सध्या काढणीचा हंगाम सुरू आहे. अशा वेळी खरंतर दर कमी असतात. मात्र निर्यातीत मोठी वाढ झाल्यामुळे गव्हाचे भाव चढेच राहिलेत. आगामी काळात भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...