आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त:UPSC झालेले अधिकारी डाकू; कोंबडी चोरांना शिक्षा देता येते, पण त्यांना स्पर्शही करता येत नाही, केंद्रीय मंत्र्याचे विधान

भुवनेश्वर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय मंत्री विश्वेश्वर टुडू यांनी हे वादग्रस्त विधान शनिवारी बालासोर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील कार्यक्रमात केले.  - Divya Marathi
केंद्रीय मंत्री विश्वेश्वर टुडू यांनी हे वादग्रस्त विधान शनिवारी बालासोर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील कार्यक्रमात केले. 

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) निवड झालेले अधिकारी डाकू असल्याचे वादग्रस्त विधान ओडिशाचे भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री विश्वेश्वर टुडू यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केले आहे. ते म्हणाले - 'एखाद्या कोंबडी चोराला शिक्षा देता येते. पण जो अधिकारी उत्खनन माफिया चालवतो त्याला साधा स्पर्शही करता येत नाही. कारण, व्यवस्था त्याचे संरक्षण करते.' विश्वेश्वर यांनी बालासोर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत आयोजित कार्यक्रमात हे विधान केले.

वि​​​​​​श्वेश्वर म्हणाले - UPSC चे लोक हुशार असतात असा माझा भ्रम होता

विश्वेश्वर म्हणाले, 'UPSC कार्यालय दिल्लीत माझ्या बंगल्यामागेच आहे. सुरुवातीला माझ्या मनात त्यांच्यासाठी खूप सन्मान होता. पण आता नाही. यूपीएससीतून निवड होणारे अधिकारी खूप हुशार असतात असे मला वाटत होते. ते नेहमीच उच्च पदांवर असतात. पण आता हे अधिकारी खरे दरोडेखोर असल्याचे माझे ठाम मत झाले आहे. 100 टक्के अधिकारी असे असतात असे मी म्हणत नाही. पण त्यातील अनेक अधिकारी डाकूच असतात.'

UPSC विषयी खूप सन्मान होता, आता नाही

विश्वेश्वर यांनी प्रश्न केला की, असे शिकले-सवरलेले लोक आपल्या समाजात असतील, तर आपला समाज भ्रष्टाचार व अन्याय अत्याचारात आकंठ का बुडाला आहे. हे सर्वकाही आपल्या शैक्षणिक व्यवस्थेतील नैतिकतेचा अभावामुळे होत आहे. आपल्यात आध्यात्मिक शिक्षण व विचारांचा अभाव आहे.