आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bitten By A Loose Dog, The Breeder Is Responsible; Animal Rights Need Balance: Court

लोकांची सुरक्षा:मोकाट कुत्र्याचा चावा, पोसणारेच जबाबदार ; प्राण्यांच्या हक्कात संतुलन हवे : कोर्ट

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांना अन्नपाणी, खाद्यपदार्थ देणाऱ्यांनी या कुत्र्यांच्या लसीकरणाची जबाबदारी घ्यावी तसेच या कुत्र्यांनी कुणावर हल्ला करून जखमी केल्यास उपचाराच्या खर्चाची जबाबदारीही पशुप्रेमींवर टाकली जाऊ शकते, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

रस्त्यांवरील मोकाट कुत्र्यांशी संबंधित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली त्या वेळी नागरिकांची सुरक्षा आणि प्राण्यांचे हक्क यामध्ये संतुलन राखले गेले पाहिजे, असे मत न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती जे.के.माहेश्वरी यांनी व्यक्त केले. आमच्यापैकी खूप लाेकांना कुत्रे आवडतात. मीसुद्धा कुत्र्यांना खायला देतो. ज्यांना कुत्र्यांची देखभाल करायची आहे त्यांनी करावी; पण मग जबाबदारीही निश्चित झाली पाहिजे. मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर उचित तोडगा काढण्यात यावा, असे मत न्या.खन्ना यांनी व्यक्त केले. मोकाट कुत्र्यांविषयी याचिका दाखल केलेल्या विविध पक्षकारांकडून म्हणणे मागवण्यात आले असून पुढील सुनावणी २८ रोजी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...