आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • BJP Along With Ram And Ratha Started The Yatra For Change Of Power In West Bangal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प. बंगालची रणधुमाळी:राम आणि रथासह भाजपने केला सत्तापरिवर्तनासाठी यात्रेस प्रारंभ

काेलकाता25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नड्डांच्या उपस्थितीत नदिया जिल्ह्यातून प्रचारास सुरुवात

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने रथयात्रेद्वारे शनिवारी आपल्या िनवडणूक प्रचार माेहिमेला सुरुवात केली. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शनिवारी सायंकाळी नदिया जिल्ह्यातील नवद्वीपमध्ये परिवर्तन यात्रेचा आरंभ केला. तत्पूर्वी नड्डा यांनी राेड शाे केला. “जय श्रीराम’च्या घाेषणेसह रॅलीला मार्गदर्शन केले. रथयात्रा तसेच रॅलीत नड्डा यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला केला. आता परिवर्तनाला सुरुवात हाेत आहे. हा बदल केवळ सरकारच्या पातळीवर नव्हे तर विचारांचाही असेल. ममतादीदींनी ‘माटी-मानुष’ची शपथ घेऊन १० वर्षांपूर्वी सरकार स्थापन केले. दहा वर्षांत लूट झाली. मातीचा अनादर झाला आणि मानुषचे संरक्षण झालेले नाही. ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील ७० लाख शेतकऱ्यांना सन्मान निधी याेजनेपासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे. निवडणुकीच्या ताेंडावर ममता सरकार आता ही याेजना लागू करू लागले आहे, असे सांगून नड्डा यांनी ममतांना ‘अब पछताए होत क्या, जब चिड़िया चुग गई खेत।’ असा टाेला लगावला. शेतकऱ्यांची सेवा केली असती तर असे दिवस पाहायला मिळाले नसते, असे नड्डा यांनी सांगितले.

आता तृणमूलची माेटारसायकल रॅली
भाजपच्या रथयात्रेला उत्तर देण्यासाठी तृणमूलने नदिया जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी माेटारसायकल रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. या जनसमर्थन रॅलीत हजाराे माेटारसायकल समाविष्ट असतील, असे सूत्रांनी सांगितले. भाजपने या मुद्यावर आघाडी घेतल्याने तृणमूलची धडपड सुरू आहे.

पश्चिम बंगालमध्येही येईल सुशासन
भाजप अध्यक्ष म्हणाले, पंतप्रधान माेदी यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये परिवर्तनाची वेळ आली आहे. राज्यातही सुशासन येईल. ममता सरकारने भ्रष्टाचाराची पाळेमुळे रुजवली. प्रशासनाचे राजकारण करण्यात आले आहे. पाेलिसांचा वापर गुन्हेगारीला प्राेत्साहन देण्यासाठी केला जात आहे.

ममतांना एवढा राग येतो तरी का म्हणून ?
रॅलीदरम्यान जे.पी. नड्डा म्हणाले, आम्ही बाेलायला लागलाे की समाेर “जय श्रीराम’ची घाेषणा हाेते. हेलिपॅडने उतरल्यानंतर इकडे येताना दुतर्फा लाेकांना अभिवादनासाठी हात उंचावत हाेताे. तेव्हा लाेक जय श्रीराम असे म्हणत हाेते. ममतांना जय श्रीराम म्हटल्याने एवढा राग का येताे?

कार्यक्रम : पाच टप्प्यांत सर्व २९४ ठिकाणांवरून यात्रा जाणार
भाजपने राज्यातील सर्व २९४ जागांवर रथयात्रा काढण्याची याेजना आखली आहे. हा कार्यक्रम पाच टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. ११ फेब्रुवारीला गृहमंत्री अमित शहादेखील यात्रेला रवाना करतील. शनिवारी नड्डा यांनी सुरू केलेली रथयात्रा नदिया, मुर्शिदाबाद, उत्तर २४ परगणाच्या काही भागांतून बैरकपूरपर्यंत जाईल. ८ फेब्रुवारीला कूचबिहार टाऊनहून रथयात्रा सुरू हाेईल. ती दार्जिलिंग, कलिम्पाेंग, जलपायगुडी, उत्तर दिनाजपूर, अलिपुरदुआर, कूचबिहारहून मालदापर्यंत जाईल. ९ फेब्रुवारीला झाडग्रामहून रथयात्रा सुरू हाेईल.

बातम्या आणखी आहेत...