आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP And Congress Hope For Victory; Preparations Are Also Underway For Statements And Arguments In Case Of Defeat

विधानसभा निवडणूक:भाजप व काँग्रेसला विजयाची आशा; पराभूत झाल्यास वक्तव्ये व युक्तिवाद काय असेल याचीही तयारी सुरू

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पक्षांचे रणनीतिकार निकालानंतरच्या स्थितीवर करत आहेत मंथन

पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागतील. मात्र, सर्व पक्षांतील प्रमुख नेते निकालाचा दिवस व त्यानंतरच्या स्थितीबाबत तयारीला लागले आहेत. भाजप व काँग्रेसने “सर्वोत्कृष्ट व सर्वात वाईट’ स्थितीसाठी पॅनल व त्यांची भूमिका निश्चित करण्याकडे लक्ष देणे सुरू केले आहे. दोन्ही पक्षांकडून वेगवेगळ्या निकालांसाठी प्रवक्त्यांना तयार केले जात आहे. विजयाचे श्रेय कोणाला द्यायचे व अपेक्षेनुसार निकाल न लागल्यास काय भूमिका घ्यायची याचे प्रशिक्षण दिले जात आहे. भाजपची धुरा गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे आहे. आसामात सत्ता टिकवणे व प. बंगालमध्ये सरकार स्थापनेचा पक्षाला विश्वास आहे. तसेच दक्षिणेतील राज्यांमध्ये जनाधार वाढणे व पुद्दुचेरीत अण्णा द्रमुकसोबत सरकार स्थापनेची संधी दिसते. प्रवक्त्यांना वाईट स्थितीसाठीही तयार केले जात आहे. बंगालमध्ये मजबूत विरोधक, आसामात जोरदार टक्कर व दक्षिणेत मतदानातील टक्केवारी वाढल्याचा दावा केला जाईल. जागा वाढल्या तर राज्यसभेत बहुमत मिळवण्याबाबत बोलण्यावर प्रवक्त्यांचा जास्त भर असेल. काँग्रेसला आशा आहे की, आसाम व केरळमध्ये सत्ता मिळेल.

तामिळनाडू-पुद्दुचेरीत डीएमकेसोबत सरकार येईल व बंगालमध्ये टीएमसीला जागा कमी पडल्यास किंगमेकर होण्याची संधी मिळेल. निवडणुकीनंतरच्या रणनीतीची धुरा रणदीपसिंह सुरेजवाला यांच्याकडे आहे. पक्ष जिंकल्यास राहुल गांधींना श्रेय दिले जाईल. हरल्यास सहकारी पक्षांकडे बोट दाखवले जाईल.

...आणि पोल पंडित म्हणताहेत- महिला व्होट बँक निर्णायक
सी व्होटरचे संचालक यशवंत देशमुख सांगतात की, या निवडणुकीत महिला व्होट बँकेचा प्रभाव दिसेल. सीएसडीएसचे संजयकुमार यांच्यानुसार दक्षिणेत टक्केवारीच्या दृष्टीने भाजपला फायदा होऊ शकतो. केरळमध्ये मतांची टक्केवारी १३-१४% पेक्षा जास्त होऊ शकते. बंगालमध्ये भाजप चांगलीच टक्कर देत असला तरी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात पक्ष अपयशी ठरला आहे. लोकसभेच्या तुलनेत भाजप राज्यांमध्ये ७-८% ते २०% पर्यंत मते गमावत असतो. जर त्यांनी ५% जरी मते गमावली तरी ३५% मतांसह सत्तेत येण्याची अपेक्षा करता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...