आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'BJP And TRS Help Each Other, 'TRS, BJP Two Sides Of Same Coin Rahul Gandhi Attack On BJP And TRS

राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल:भाजप आणि टीआरएस एकमेकांना मदत करतात, संपूर्ण काम पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावर होते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणामध्ये पोहचली आहे. मंगळवारी (1 नोव्हेंबर) हैदराबादमध्ये राहुल गांधी यांनी या दौऱ्यादरम्यान जाहीर सभेला संबोधित केले. "भाजप-आरएसएस द्वेष पसरवण्याचे काम करतात. आमचा प्रवास द्वेष आणि हिंसाचाराच्या विरोधात आहे. यामुळे देश मजबूत होतो, कमजोर होत नाही. कोणतीही शक्ती ही यात्रा रोखू शकत नाही, असे भाजपवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेही उपस्थित होते. राहुल गांधी पुढे म्हणाले की, मला वाटले की दिल्ली प्रदूषणात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. पण हैदराबादमध्ये दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषण आहे. लोकसभा आणि राज्यसभेत विधेयके मंजूर करण्यासाठी टीआरएस भाजपला मदत करते.

केसीआर पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावर काम करतात

राहुल गांधी म्हणाले की, भाजप आणि टीआरएसवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले, भाजप आणि टीआरएस एकत्र काम करतात. निवडणुकीपूर्वी ते फक्त नाटक करतात. मोदीजी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री फोनवर बोलतात. पंतप्रधानांच्या सांगण्यावरून तेलंगणाचे मुख्यमंत्री काम करत आहेत.

चार मिनारसमोर तिरंगा फडकवला

याआधी मंगळवारी राहुल गांधी यांनी हैदराबादची ओळख असलेल्या चार मिनारसमोर तिरंगा फडकावला. सुमारे 32 वर्षांपूर्वी त्यांचे वडील आणि तत्कालीन पक्षाध्यक्ष राजीव गांधी यांनीही याच ठिकाणाहून 'सद्भावना यात्रा' सुरू केली होती. राहुल गांधींनी राष्ट्रध्वज फडकावला तेव्हा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग, तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे (TPCC) अध्यक्ष रेवंत रेड्डीही उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी त्यांचे वडील राजीव गांधी यांना व्यासपीठावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये राहुल गांधी यांनी भर पावसात जनसभेला संबोधित केले होते.
कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये राहुल गांधी यांनी भर पावसात जनसभेला संबोधित केले होते.

महाराष्ट्रात कधी येणार?

राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा गत 7 सप्टेंबर रोजी सुरू झाली. दक्षिण भारतातील कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जाणारी ही यात्रा महाराष्ट्रात देगलूरमार्गे 7 नोव्हेंबरला दाखल होईल. त्यानंतर नांदेडमार्गे ही यात्रा 6 दिवसांत तब्बल 383 किमीचे अंतर पार करून करून आपल्या पूर्वनियोजित ठिकाणाकडे मार्गस्थ होईल. भारत जोडो यात्रा 5 महिन्यांत सुमारे 3 हजार 570 किमीचे अंतर पार करून काश्मीरमध्ये पोहोचेल. काँग्रेसची ही महत्वकांक्षी यात्रा 12 राज्य व 2 केंद्रशासित प्रदेशांतून जाईल.

बातम्या आणखी आहेत...