आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूज पोर्टल 'न्यूज क्लिक'वर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी या पोर्टलवर परदेशातून निधी घेऊन देशाची बदनामी करण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, देशात जेंव्हा काही चांगले घडते तेंव्हा यांच्याकडून हे कार्यक्रम खराब करण्याचा प्रयत्न केला जातो.
आम्ही देशातील 130 कोटी लोकांना लस देण्यात गुंतलो आहे. परंतु, आमच्या सरकार बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आम्हाला बदनाम करण्यासाठी या न्यूज पोर्टलला परदेशातून निधी उपलब्ध होत असल्याचा आरोप संबित पात्रा यांनी केला आहे.
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला
संबित पात्रा पुढे म्हणाले की, देशातील महत्वाचे सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला ही या पोर्टलकडून बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यांच्याकडून यावर वारंवार प्रश्न उपस्थित केले गेले. परंतु, न्यायालयाने हा चांगला प्रकल्प असून त्यास पुढे घेऊन जाण्यास सांगितले होते. आमचे सरकार शेतकऱ्यांना देव मानते. परंतु, आमच्यातदेखील मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. जेंव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेंव्हापासून ते परदेशी शक्तीला खटकत आहे. त्यामुळे त्यांना बदनाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत असेही ते म्हणाले.
30 हजार कोटींचा बेकायदेशीर निधी
'न्यूज क्लिक' हे एक साधे पोर्टल असून याला पीपीके नावाच्या कंपनीद्वारे चालविले जाते. परदेशी संस्था या पोर्टलला निधी देत असून एफडीआयच्या माध्यमातून याला अर्थसहाय्य दिले जात आहे. ज्या कंपनीने न्यूज पोर्टलला वित्तपुरवठा केला आहे त्याचे नाव वर्ल्डवाइड मीडिया होल्डिंग कंपनी आहे. ही कंपनी अमेरिकेची असून याने न्यूजक्लिकला 30 हजार कोटी दिले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.