आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तिसर्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल "क्रांतीकारक अभिनंदन" केल्याने वादाला सुरुवात झाली आहे. भाजपने विजयन यांच्यावर तीव्र हल्ला चढवला. शहीद जवानांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली आहे.
भाजपचे केरळ प्रवक्ते पीके कृष्णदास यांनी मुख्यमंत्र्यांनी चीनच्या राष्ट्रपतींचे कौतुक आणि अभिनंदन केल्याबद्दल टीका केली आहे. भाजप नेते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्याने सशस्त्र दलांचा अपमान केला आहे.
मुख्यमंत्री गलवान विसरले... - पीके कृष्णदास
पीके कृष्णदास म्हणाले की, ते गलवानला विसरले आहेत, जिथे चिनी सैन्याने 20 भारतीय सैनिक मारले होते. मुख्यमंत्र्यांनी सशस्त्र दलांना लाजवले आहे. त्यांनी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची माफी मागावी. भाजप त्यांचा निषेध करते.
मुख्यमंत्री विजयन यांनी केले हे ट्विट
शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. जिनपिंग यांचे अभिनंदन करताना पिनाराई विजयन यांनी चीन अधिक समृद्ध व्हायला हवा, असे म्हटले आहे. त्यांनी ट्विट केले की, जागतिक राजकारणात चीन एक प्रमुख आवाज म्हणून उदयास आला आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. चीनला अधिक समृद्ध करण्यासाठी तुमच्या सतत प्रयत्नांसाठी शुभेच्छा."
शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी, चीनमधील सर्वात ताकदवान नेते झाले
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तिसऱ्या कार्यकाळावर 10 मार्च रोजी अधिकृत शिक्कामोर्तब झाले. यासोबतच त्यांची ताकद आणखीन वाढली आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत त्यांची तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली होती. तेव्हा ते म्हणाले होते - जगाचा चीनला वगळून विकास होऊ शकत नाही आणि जगाला चीनची गरज आहे. चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या बैठकीत जिनपिंग यांच्या तिसऱ्या कार्यकाळावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
2012 पासून सत्तेवर
जिनपिंग 2012 मध्ये सत्तेवर आले होते. त्यांच्या पूर्वी राष्ट्राध्यक्ष पदावर राहिलेले सर्व नेते पाच वर्षांचे दोन कार्यकाळ किंवा 68 वर्षांचे झाल्यावर निवृत्त होत होते. 2018 मध्ये चीनने राष्ट्राध्यक्ष पदासाठी दोन कार्यकाळांची मर्यादा संपुष्टात आणली होती. यानंतर जिनपिंग आता चीनचे सर्वात शक्तीशाली नेते बनले आहेत.
माओनंतर सर्वाधिक काळ देशाचे नेते
तिसऱ्या कार्यकाळासाठीच्या नियुक्तीसोबतच जिनपिंग आता माओ त्से तुंग यांच्यानंतर देशाचे सर्वाधिक काळ नियुक्त असणारे नेते बनले आहेत. बीजिंगमध्ये नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या हजारो प्रतिनिधींनी शी यांच्या राष्ट्राध्यक्ष आणि पुढच्या पाच वर्षांसाठी सैन्य प्रमुख म्हणून नियुक्तीसाठी मतदान केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.