आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्झिट पोलमध्ये गुजरातेत भाजपची सरशी:गुजरातेत लागोपाठ सातव्यांदा सत्ता मिळवू शकते भाजप, आप खाते उघडणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुजरात; भाजपला १२३-१३८, काँग्रेसला ३५ ते ४८ आणि ‘आप’ला ४-१० जागा मिळण्याचा अंदाज
  • िहमाचल; पोल ऑफ पोल्सनुसार, भाजपला ३५ जागांसह बहुमत मिळेल आणि काँग्रेसला ३० जागा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे गृहराज्य गुजरातमध्ये सोमवारी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होताच हिमाचलसह दोन्ही राज्यांचे एक्झिट पोलही समोर आले. त्यानुसार, भाजप गुजरातमध्ये लागोपाठ सातव्यांदा (१९९५ ते २०२२) सरकार बनवणार आहे. पोल ऑफ पोल्सनुसार, भाजप १२८-१४१ जागांसह प्रचंड बहुमत मिळवणार आहे. तर, प्रथमच मोदींच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणारा आम आदमी पक्षही ५-११ जागांसह खाते उघडणार आहे. काँग्रेसला यंदा सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तथापि, हिमाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेस यांच्यात सामना आहे. एक्झिट पोलमध्ये ३५ जागांसह भाजप बहुमत मिळवत आहे, तर काँग्रेस ३० जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिकडे गुजरातमध्ये यंदा ६२ टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळी ते ६९ टक्के होते. गुजरात-हिमाचलचा निकाल ८ डिसेंबरला घोषित होईल.

विधानसभा निवडणुकीत दिसत आहे भाजपचा दबदबा...पण दिल्ली एमसीडीमध्ये ‘आप’चा क्लीन स्वीप जातीय गणित : चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार... {६१% राजपुतांनी भाजप, २५% नी काँग्रेस, ७% नी आपची निवड केली. {५९% पटेल भाजप, १९% काँग्रेस, १६% आपच्या पारड्यात गेले. {४४% मुस्लिम काँग्रेस, ३९% आप आणि १३% भाजपसोबत गेले. {५५% ओबीसी भाजप, २६% काँग्रेस आणि १४% आम आदमी पक्षासोबत राहिले.

एक्झिट पोलचे वास्तव गेल्या वेळी अंदाज अगदी अचूक, मतांचा टक्काही मांडला होता २०१७ च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत.. तेव्हा एक्झिट पोलमध्ये भाजपला ९९-१४२ तर काँग्रेसला ४७-८२ जागा दिल्या होत्या. प्रत्यक्ष निकालात भाजपला ९९, काँग्रेस-७७, भाजपचा मतांचा टक्का ५० टक्के, काँग्रेसचे ४२ % होते. अंदाज जवळपास खरा होता. {२०१४-१९ च्या लोकसभा निवडणुकीसह गेल्या २९ विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल ५५ % बरोबर, ४५ टक्के खोटे ठरले. 2021 मध्ये अंदाज आपटला : प. बंगाल... मतदानोत्तर पाहणीत तृणमूल १३७-१५२, भाजप १२७-१४३ वर दाखवले होते. प्रत्यक्ष तृणमूल २१३, भाजप ७७ जागी जिंकले.

{दिल्ली एमसीडी : एक्झिट पोलमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पार्टीला बहुमत दाखवले. एकूण २५० वॉर्डांत आपला १५५, भाजपला ८४, काँग्रेसला ७ जागी विजय मिळेल, असा अंदाज वर्तवला. {पोटनिवडणूक : पाच राज्यांतील (यूपी, बिहार, राजस्थान, आेडिशा, छत्तीसगड) ६ विधानसभा, मैनपुरी लोकसभा जागेवर सोमवारी मतदान झाले. त्याचा निकाल ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे.

विश्लेषण : गुजरातेत १० वर्षांत सर्वात कमी मतदान, २०१७ पेक्षा ७.९ % कमी अहमदाबाद | गुजरातमध्ये दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात केवळ ५९.२४ % मतदान झाले. दोन टप्पे मिळून एकूण ६१.२७% मतदानाची नोंद झाली. हे गेल्या निवडणुकीपेक्षा (६९.२%) सुमारे ७.९ % कमी असून गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी प्रमाण आहे. तथापि, अद्याप अंतिम आकडेवारी हाती आलेली नाही. गुजरातमध्ये गेल्या ६० वर्षांच्या इतिहासात मतदानाच्या प्रमाणात दुसऱ्या क्रमांकाची मोठी घट आहे. यापूर्वी १९८० मध्ये सन १९७५ च्या तुलनेत ११.७२% टक्के कमी मतदान झाले होते. परंतु त्या वेळी कमी मतदान असूनही काँग्रेसने १४१ जागा मिळवून सत्ता कायम राखली होती. यंदाच्या निवडणुकीत एकाही जिल्ह्यात सन २०१७ पेक्षा जास्त मतदान झाले नाही.

बातम्या आणखी आहेत...