आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहंमद पैगंबरांवर आक्षेपार्ह टिप्पणीचे प्रकरण:भाजपने बनवली धार्मिक भावना दुखावणाऱ्या 38 नेत्यांची यादी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने धार्मिक भावना दुखावणाऱ्या ३८ नेत्यांची यादी बनवली आहे. यातील २७ नेत्यांना अशी वक्तव्ये करू नयेत, अशी सक्त ताकीद देण्यात आली. त्यांना सांगण्यात आले की, धार्मिक मुद्द्यांवर वक्तव्य करण्यापूर्वी सक्षम पदाधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी.

मोहंमद पैगंबरांवर वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी नूपुर शर्मा व नवीनकुमार जिंदल यांच्यावर कारवाई केल्यानंतर मागील ८ वर्षांत (सप्टेंबर २०१४ ते मे २०२२ पर्यंत) नेत्यांनी केलेली वक्तव्ये आयटी तज्ज्ञांच्या मदतीने शोधून काढली. सुमारे ५२०० वक्तव्ये अनावश्यक आढळली.

सुमारे २७०० वक्तव्यांतील शब्द संवेदनशील आढळले. ३८ नेत्यांची वक्तव्ये धार्मिक भावना दुखावणाऱ्या गटात आढळली. यात अनंतकुमार हेगडे, शोभा करंदलाजे, गिरिराज सिंह, तथागत राय, प्रताप सिम्हा, विनय कटियार, महेश शर्मा, टी. राजा सिंह, विक्रमसिंह सैनी, साक्षी महाराज, संगीत सोम आदींच्या वक्तव्यांचा समावेश आहे.

कुवेत : काही सुपर स्टोअर्सनी भारताची सामग्री विक्री रोखली
अरब देशांत बायकॉट इंडिया सोशल मीडिया ट्रेंड करत आहे. यादरम्यान, कुवेतच्या काही सुपर स्टोअर्सनी भारतात तयार झालेल्या सामग्रीची विक्री रोखली आहे. कुवेत सरकारनुसार, भारतात सत्तेत असलेल्या पक्षनेत्यांनी मुस्लिमांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. यूएई, जॉर्डन आणि इंडोनेशियानेही या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे.संबंधित. देश-विदेश

बातम्या आणखी आहेत...